कागल मध्ये किरकोळ कारणावरून डोक्यात धारदार हत्याराने वार

कागल (विक्रांत कोरे): किरकोळ कारणावरून एकाच्या डोकीत तलवारी सारख्या धारदार हत्याराने तीन वार केले. या झालेल्या हल्ल्यात कृष्णात जयसिंग सोनुले वय वर्षे – 50, राहणार- महात्मा फुले वसाहत कागल, हा गंभीर जखमी झाला आहे. बापूसाहेब महाराज चौकात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे. कागल पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

Advertisements

      वैभव अमरसिंह रजपूत वय वर्षे 28 राहणार -जुनी बस्ती गल्ली- कागल, सोहेल शेहनवाज शेख वय वर्षे 24, राहणार- मणेर मळा ,तालुका -करवीर ,इमरान राजू मुजावर ,वय वर्षे 34, राहणार -विक्रमनगर ,कोल्हापूर सद्दाम -पूर्ण नाव पत्ता माहित नाही. ही कागल पोलिसांनी अटक केलेल्यांची नांवें आहेत .

Advertisements

         पोलिसांच्या माहितीनुसार गल्लीतील मुलासोबत बोलत का थांबला होतास या किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यानंतर सद्दाम, सोहेल व इमरान यांना वैभव रजपूत ने फोन वरून बोलावून घेतले आणि कृष्णात सोनुले यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तलवारी सारख्या धारदार हत्याराने डोकीत तीन वार केले. या हल्ल्यात कृष्णात सोनुले हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एन आर खैरमोडे हे करीत आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!