गडहिंग्लज – धनंजय शेटके
आज दुपारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अनेक मंत्र्यांच्यावर विविध घोटाळ्यांचे आरोप केले असून या मध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे देखील नाव घेतले असून त्यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचा तसेच हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्या मध्ये गैर कारभार झाल्याचा आरोप केला आहे.त्या मुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये संतापाची लाट उसळली आहे.आज सायंकाळी पाच वाजता गडहिंग्लज येथील दसरा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांचा तिरडी मोर्चा काढून निषेध केला या वेळी बोलताना गडहिंग्लज राष्ट्रवादीचे शहर प्रमुख सिद्धार्थ बन्ने म्हणाले कि मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोर गरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे.मुश्रीफ साहेबांचा साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा घामाच्या पैश्या वर उभारला आहे यांची माहिती अगोदर किरीट सोमय्या यांनी घ्यावी,तसेच भाजप ने त्यांना योग्य ती समज द्यावी.कोणावरही आरोप करण्यापूर्वी समोरची व्यक्ती कोण आहे हे समजून घ्यावे असा सल्ला बन्ने यांनी दिला.आज आम्ही फक्त तिरडी मोर्चा काढतोय उद्या त्याची तिरडी उचलल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.असा इशारा बन्ने यांनी दिला.या निषेध व्यक्त करण्यासाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील,नगरसेवक हारून सय्यद,किरण कदम,महेश सलवादे,रमजान अत्तार,गुंड्या पाटील,यांच्या सह सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,महिला आघाडी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस आदी उपस्थित होते