हुपरी परिसरातील अंमली पदार्थ (गांजा) विक्रीस तात्काळ आळा घाला, अन्यथा शिवसैनिक याचा बंदोबस्त करतील – जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

हुपरी : हुपरी व परिसरातील अंमली पदार्थ (गांजा) सेवन व राजरोसपणे सुरू असलेल्या विक्रीस तात्काळ आळा घालावा व या जाळ्यात सामील असणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना कठोर शासन करावे. अन्यथा शिवसैनिक कायदा हातात घेवून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करेल, अशा आशयाचे निवेदन शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व पदाधिकारी यांनी स.पो.नि. पंकज गिरी हुपरी पोलीस ठाणे यांना दिले.

Advertisements

यावेळी विभागप्रमुख विनायक विभूते, शहरप्रमुख अमोल देशपांडे, माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील, संजय वाईंगडे, युवासेना शहराधिकारी भरत देसाई, नगरसेवक बाळासाहेब मुधाळे, नगरसेविका सौ. पूनम राजेंद्र पाटील, आघाडी तालुका संघटिका सौ.उषा चौगुले, संजय पाटील, विकास ढवळे, भरत मेथे, अरुण गायकवाड, संदिप भंडारे,अक्षय चाणक्य (आबा), शिवाजी मुरलीधर जाधव, संताजी देसाई, बाजीराव आरडे, विजय जाधव, वैभव लायकर, रणजीत वाईंगडे, अविनाश भंडारे, अभिनंदन माणकापूरे, ऋषिकेश चिगरे, सुनील गुदले, विनायक नकील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!