संजय मंडलिक व संजयबाबा घाटगे यांच्यातील एकीचा दुवा मी असणार – प्रवीणसिंह पाटील

मुरगूड ( शशी दरेकर )

       नुकतीच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांची बैठक मुरगूड ता . कागल येथे आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी  यमगेचे सरपंच संदीप किल्लेदार होते .
      यावेळी प्रविणसिंह पाटील म्हणाले
नुकतीच नगरपालिका निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आम्हा भाजप – शिवसेना युतीला चांगले यश मिळाले. या यशाचे मानकरी मंडलिक व पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत.
       तसेच शिवसेनेचे माजी खासदार  संजय मंडलिक व माजी आमदार संजय बाबा घाटगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले हीच युती टिकवण्यासाठी मी संजयबाबा व संजयदादा यांची दोन वेळा बैठक घडवून आणली. कागल तालुक्याचे राजकारण पैशाच्या जीवावर सध्या सुरू आहे. हेच पैशाचे राजकारण मोडीत काढण्यासाठी ह्या दोन नेत्यांनी ‘बाबा व दादां’नी एकत्र यावं अशी विनंती मी बैठकीत केली आहे.
            स्वागत सम्राट मसवेकर, प्रास्ताविक जगन्नाथ पुजारी यांनी केले. यावेळी संजय भारमल (मेतके), किसन कापसे (अवचितवाडी ) ,सुधीर मसवेकर (करंजिवणे ), रमेश पाटील (सोनगे),  सरपंच संभाजी गायकवाड  (अवचितवाडी), विश्वास चौगले ( चिमगाव), आनंदराव कल्याणकर, नगरसेवक सत्यजित पाटील, दिग्विजय पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
           यावेळी प्रमुख उपस्थित वसंतराव शिंदे, बाळासो आंगज, निवृत्ती करडे, बाळासाहेब पोतदार, कुंडलिक भांडवले, राजेंद्र पाटील (मळगे ), एम एस खामकर, भरत घोटणे, आनंदराव मोहिते, नगरसेवक रणजीत भारमल, संजय मोरबाळे, सागर भोसले, राहुल वंडक़र, अमर ढेरे, अमोल रणवरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
राजू चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. सुशांत मगदूम यांनी मानले.
      

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!