
मुलगी अल्पवयीन, तरुणास अटक
कागल (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला लॉजवर नेवून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. हा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कागल येथे घडला. आरोपीसह लॉज मालकास, कागल पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे.
उन्मेश अनिल शिंदे वय वर्षे 19, राहणार तळंदगे फाटा, इंगळे वसाहत. इंगळी, तालुका -हातकणंगले व लॉज मालक रवींद्र तानाजी कारंडे ,वय वर्ष 29 इंगळी रोड, नाना घाट, हुपरी, सध्या राहणार -साई पॅलेस लॉज, राष्ट्रीय महामार्गाजवळ कागल.
अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडित मुलीने कागल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. ती तक्रारीत म्हणते, आरोपी उमेश शिंदे याने लग्नाचे आमिष दाखविले .त्याचा गैरफायदा घेत राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्वेस असलेल्या कमानी जवळच्या साई पॅलेस लॉजवर नेऊन शरीर संबंध ठेवले. तारीख 3 व 25 ऑगस्ट 2024 या दोन दिवशी आरोपीने पीडित मुलीचा गैरफायदा घेतला आहे.
कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सबइन्स्पेक्टर नागेश खैरमोडे हे पुढील तपास करीत आहेत.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.