मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता . राधानगरी येथिल जिज्ञासा क्लासच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी वेद प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात व जिल्ह्यात घवघवीत यश संपादन केले. माई एज्यूकेशन सोसायटी व वेद पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय घेतलेल्या वेद प्रज्ञाशोध परीक्षेत सरवडेच्या जिज्ञासा मार्गदर्शन वर्गातील कु. हर्षाली बाबासाहेब रेपे हीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर सेजल स्वप्नील पेडणेकर याने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला.
दिव्या संजय कोपार्डेकर, राजविर राकेश फराकटे जिल्हयात व्दितीय क्रमांक तर आराध्या कृष्णात कुदळे हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. या वेद प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचे व सरवडेच्या जिज्ञासा क्लासच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. दिपाली बाबासाहेब रेपे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.