सानिका स्पोर्ट्स मार्फत हर घर तिरंगा मोहीम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स मार्फत हर घर तिरंगा मोहीम राबविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ही मोहीम सानिका स्पोर्टने स्वखर्चाने  ही मोहीम राबविली आहे.

Advertisements

  प्रत्येक मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा मूळ हेतू तर आहेच शिवाय विविधतेत एकता ही आपल्या देशाची सामाजिक बांधणी आहे तीही मजबूत व्हावी हा उद्देश असल्याचे सानिका चे संस्थापक दगडु शेबवी यांनी सांगितले.

Advertisements

    १४ ऑगस्ट ला पाकिस्तानात बलुचीवस्थान व पी ओ के मध्ये तेथील राष्ट्रीय ध्वजाचा जागोजागी अवमान झाल्याच्या बातम्या टीव्ही वर पहायला मिळाल्या.येथे आम्ही तिरंगा मागून घेत होतो व घराच्या दर्शनी भागावर अभिमानाने फडकवत होतो असे नागरिकांनी सांगितले.

Advertisements

  तिरंग्याचा अवमान होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात यावी अशा मार्गदर्शक सूचना स्वयंसेवकांनी दिल्या आहेत. एस टी बस स्थानक परिसरात, सर्वजनिक ठिकाणी व कांहीं घरात ध्वज वाटण्यात आले.

AD1

2 thoughts on “सानिका स्पोर्ट्स मार्फत हर घर तिरंगा मोहीम”

Leave a Comment

error: Content is protected !!