कागल(प्रतिनिधी): कागल नगरपालिकेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष विवेक लोटे व पालिका मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ज्येष्ठ गुरुजी श्री चौगुले सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जयंतीवेळी पालिके मधील आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप उपनगराध्यक्ष विवेक लोटे व मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जयंती नंतर आरोग्याची शपथ घेण्यात आली व कागल संपूर्ण शहर तसेच परिसर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छ करण्यात आला यामध्ये लक्ष्मी टेकडी देवालय पाजर तलाव परिसर जयसिंगराव तलाव परिसर दूधगंगा नदी परिसर स्वच्छ करण्यात आला. जयंतीस आरोग्य विभाग प्रमुख नितीन कांबळे, दस्तगीर पखाली, उत्तम निकम, पालिका कामगार संघटना अध्यक्ष सुरेश शिंदे, उपाध्यक्ष नंदकुमार घाडगे, जयंती विभाग प्रमुख सुरेश रेडेकर, पाणीपुरवठा विनायक जाधव, उत्तम खोत, राहुल गाडेकर, रमेश कांबळे तसेच पालिकेच्या आरोग्य कर्मचारी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
कागल नगरपालिकेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती वेळी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सोडले तर इतर एक ही लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याबाबत श्री. एम. आर. चौगुले सरांनी खेड व्यक्त केला.