मुस्लिम जमियतने मंत्री हसन मुश्रीफ यांचे मानले आभार
कागल / प्रतिनिधी – कागल येथील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी अत्यंत मर्यादित जागा उपलब्ध होती. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अथक व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उर्दू मराठी शाळेसाठी तसेच वसतिगृहासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुस्लिम जमियतच्यावतीने मंत्री मुश्रीफ यांचे पत्रकार परिषद घेऊन आभार व्यक्त करण्यात आले .
मागील वर्षापर्यंत शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग होते. पण पुढच्या शिक्षणास कोल्हापूरला जावे लागत होते. या शैक्षणिक वर्षात 8 वी च्या वर्गाला मान्यता मिळाली आहे. तसेच भविष्यात ९ वी आणि १० वी चे वर्ग सुरु करण्याबाबत मुस्लिम जमियत प्रयत्नशील आहे. यासाठी जागा अपुरी होती. मंत्री मुश्रीफ यांनी या शाळेसाठी व वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या शाळेस नेहमी मंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभत असल्याचे मुस्लिम जमियतच्यावतीने सांगण्यात आले.

या कामी कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, सुन्नत मुस्लिम जमियतचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, कार्याध्यक्ष हाजी शौकत मुजावर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, चंद्रकांत गवळी व सर्व संचालक यांचेही विशेष सहकार्य लाभल्याचे जमियतच्यावतीने सांगण्यात आले.
याप्रसंगी इरफान मुजावर, जमीर नाईक, फिरोज काझी, रियाज पठाण, मुनीर मुल्ला, जावेद नाईक, उबादा पकाली, बाबासाब पकाली, अरिफ जमादार, शानुर पकाली, अल्ताफ काझी, गौस नदाफ, इम्तियाज मकानदार, बबलू मुल्ला, निहाल जमादार यांच्यासह जमियतचे सर्व संचालक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.