कागल : नवरात्र उत्सवानिमित्त कागल आगारामार्फत दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नागरिकांसाठी नवदुर्गा दर्शनची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवेमुळे भक्तांना कागल आणि परिसरातील प्रमुख देवी मंदिरांना सहज आणि सुरक्षितपणे भेट देता येणार आहे.
कागल आगाराने लक्ष्मी मंदिर कागल, उजळाई देवी, यमाई, अम्बाबाई कोल्हापूर, तुळजाभवानी कोल्हापूर, कातायनी, वाघजाई, तुळजाभवानी हुबळी, त्यांबोळी, आणि महालक्ष्मी कोल्हापूर या ठिकाणी दर्शन यात्रेची सोय केली आहे. या यात्रेसाठी महिलांसाठी २६७ रुपये व पुरुषांसाठी ५३४ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

तपशीलवार माहिती आणि नोंदणीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा:
- श्री. संदीप पाटील : ९६५७११२५५४
- श्री. अरण लाड : ९१५६९०९५९०
- श्री. मारुती जोशी : ७७१९८९९३४१
- सौ. मीरा गिरी : ८३८०८१०८०९
- Efficient Organization: Features multiple compartments and pockets designed to hold a variety of toiletries including sh…
- Durable and Sturdy Construction: Crafted with durability in mind, this organizer is built to last, featuring strong zipp…
- Versatile and Multipurpose: While ideal for storing toiletries, this bag’s design also accommodates makeup, shaving supp…
सदर दर हे आगाराच्या नियमानुसार निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कागल आगाराने केले आहे.