कागल (विक्रांत कोरे) :
विनापरवाना गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी अचानक छापा मारला. गावठी दारू तयार करण्याचे रसायन व पत्र्याचे नऊ बॅरेल, असा एकूण 33 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला व 12 आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून ही कारवाई उजळाईवाडी तालुका करवीर येथील दारू अड्ड्यावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की उजळाईवाडी तालुका करवीर येथे कांजरभाट वसाहत आहे. तेथील एका घराच्या आडोशास कडेला पत्र्याचे नऊ बॅरेल मधून रसायने द्वारे विनापरवाना गावठी दारू तयार केली जात होती. ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा मारून सर्व साहित्य जप्त केले. शारगीद तमायचेकर सतीश गुमाने, कृष्णा गुमाने, कार्तिक गागडे,सतीश गुमाने, गोपाळ अभंगे, प्रशांत गुमाने, महिपाल नेतने, नितीन गागडे, मुकुंद मछले, जोगेंद्र तमायचेकर,अजित बागडे या सर्व आरोपींना कांजारभाट वसाहत उजळाईवाडी येथून ताब्यात घेतले आहे गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सलीम संनदी हे पुढील तपास करीत आहेत.