मुरगूड (शशी दरेकर ): निपाणी मुरगूड मार्गावरील सोनगे ता.कागल येथे भरधाव टेंपोने पादचार्यास जोराची धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाले .किरण अनंत वडेर वय 38 रा.सोनगे ता.कागल असे मयताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की सोनगे येथील शेतमजूर किरण दररोजच्या नियमाप्रमाण सकाळी 9.15 च्या सुमारास हा शेतीकामासाठी रस्त्याच्या डाव्या बाजुने जात असताना मूरगूड़कडे येणार्या MH 12 JF 0919 या भाजीपाला वाहतुक करणार्या टेम्पो ने मागूण जोरात धडक दिली व किरण तब्बल 58 फूट फरफट गेल्यामुळे किरणचा जागीच मृत्यू झाला.

धडक इतकी भीषण होती की डोक्याला मार लागल्यानंतर किरणचे केस टेम्पोच्या काचेमधे अडकलेले होते 2020 ला किरणाच्या वडीलांचा तर 6 महिन्यापूर्वी आजाराने निधन झाले होते किरण हा अशिक्षीत असल्याने गावामधे मिळेल ते काम करुन विशेष घर कामामधे मजुरम्हणून काम करुन आपला उदरनिर्वाह करत होता किरणच्या अशा अचानक जाण्याने घर रिकामे झाले असुन सर्वत्र हळहळ होत आहे.