मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड तालुका कागल येथे विश्वनाथराव पाटील घराण्याची श्रीकृष्ण जन्माष्टमीची चार पिढ्यांची परंपरा अव्याहत सुरू आहे. काळाच्या ओघात अनेक घडामोडी झाल्या असल्या तरी श्रीकृष्ण भक्तीचा हा झरा अखंड पणे सुरू आहे.
स्व.विश्वनाथराव पाटील हे स्वतः जसे कृष्ण भक्त होते तसे पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड सुद्धा होते.आद्य पूजेचा मान असणाऱ्या गणेशाची दरमहाची संकष्टी सुद्धा कधी चुकत नव्हती. अनेक वर्षे ते मुरगूड नगर परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक संकष्टीला चंद्रोदयाच्या वेळी नगर परिषदेचा भोंगा वाजत असे.

भक्तीची ही परंपरा आमच्या घराण्याने आजही अखंडपणे सुरू ठेवली आहे असे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितले. भजन,कीर्तन प्रवचन असा अष्टमीचा भरगच्च कार्यक्रम दरवर्षी असतो.यंदा पाऊस सुद्धा पालखीतून आला आणि हजेरी लाऊन गेला असे एका कृष्ण भक्ताने सांगितले. हजारों भगवत भक्तांना मुरगूड मध्येच मथुरेचे दर्शन व्हावे अशा भक्तिमय वातावरणात येथील जन्माष्टमी उत्सव संपन्न झाला.
माजी खासदार संजयदादा मंडलिक, बिद्री कारखान्याचे चेअरमन के पी पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे,माजी आमदार बजरंग देसाई ,गोकुळ चे संचालक युवराज पाटील,प्रा.अर्जुन आबिटकर, विरेंद्र मंडलिक बिद्री सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मुरगूडचे माजी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक मुरगूड विद्यालयाचे प्राचार्य एस पी पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी अशा अनेक मान्यवरांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह या उत्सवास हजेरी लावली.
कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी ठळक गोकुळाष्टमी उत्सवात मुरगूडच्या या उत्सवाची गणना होते असे भाविकांनी सांगितले.मुरगुड ता.कागल येथील स्व. विश्वनाथराव हरिभाऊ पाटील यांच्या घरी गोकुळाष्टमी गोपाळकाला धार्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला. पाटील घरासाठी गोकुळाष्टमी साजरी करायची १०४ वर्षाची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त आठ दिवस काकड आरती बाळ क्रीयडाचे अभंग भजन प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती बिद्री कारखाना जेष्ठ संचालक प्रविणसिंह पाटील यांनी दिली या वेळी दिग्विजय सिंह पाटील, सत्यजित सिंह पाटील, ज्योतिरादित्य पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.