घटस्थापना म्हणजे कृषी संस्कृतीतील माती परिक्षण व बीज उगवण क्षमता तपासणीचा प्रयोग होय – निसर्गमित्र अनिल चौगुले

राष्ट्रीय हरितसेना शिवराज विद्यालयचा पर्यावरण पुरक नवरात्रोत्सव उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) – घटस्थापना म्हणजे कृषी संस्कृतीतील माती परिक्षण व बीज उगवण क्षमता तपासणीचा प्रयोग होय.असे प्रतिपादन निसर्गमित्र कोल्हापूरचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी केले. ते येथील शिवराज विद्यालय ज्युनि. कॉलेज मुरगूडच्या राष्ट्रीय हरितसेना महाराष्ट्र राज्य अंतर्गत ‘पर्यावरण पुरक नवरात्रोत्सव साजरा करूया ‘ या विषयावर बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवराजचे प्राचार्य पी डी माने हे होते.

Advertisements

श्री.चौगुले पुढे म्हणाले,आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्व सण ,वार , उत्सव हे कृषीप्रधान असून आपल्याला निसर्गाकडे घेऊन जाणार आहे . प्रत्येक सणाच्या निमित्ताने नावारूपाला येणारी वनस्पती ही पर्यावरणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे हे लोकमानसात रुजवण्याचा तो प्रयत्न असतो.

Advertisements

नवरात्रोत्सवाच्या निमित्त आपटा, शमी, कांचन या अत्यंत बहुगुणी वनस्पतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आणि वृक्षतोड करून झाडाची पाने वाटण्यापेक्षा एकमेकाला या वृक्षांची रोपे भेट देऊन आपण दसरा साजरा केल्यास पर्यावरणाच्या सानिध्यात वृक्षांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल . तसेच पावसाळ्यानंतर दसरा सण येत असल्याने घराची स्वच्छता त्यानिमित्त करणे गरजेचे असल्याने आपण दसऱ्यापूर्वी घरांची झाडलोट व भांडीकपडे धुणे हे करत असतो .

Advertisements

यावेळी उपमुख्याध्यापक आर बी शिंदे , पर्यवेक्षक संतोष कुडाळकर, राष्ट्रिय हरितसेना समन्वयक शिक्षक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी, आर ए जालिमसर, डी एल कुंभार आदींसह हरित सेनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक प्रवीण सूर्यवंशी तर आभार एस एम कुडाळकर यांनी मानले .

Leave a Comment

error: Content is protected !!