कागल (प्रतिनिधी) : कागल बस स्थानकाजवळील गणेश मंदिर भक्त मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भेट वस्तू व देणगी कार्यक्रम करण्यात आले.
या मंडळाने covid-19 च्या पार्श्वभूमीवर चालू वर्षी इतर कार्यक्रम स्थगित करण्यात आले होते. गतवर्षीही कोविड सेंटरला गणेश मंदिर भक्त मंडळाने रुपये दीड लाखाची औषधे प्रदान केली. होती .सामाजिक बांधिलकी जपणारे या मंडळाने या वर्षीही ॓श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ॑पुतळयासाठी रोख रुपये एक लाखाची देणगी प्रदान करण्यात आली .तसेच राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील अपंग कल्याण संस्थेस बांधकाम साहित्य व शाळेचे साहित्य भेट रूपात देण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव पाटील ,उपाध्यक्ष सदाशिव पिष्टे,गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ ,माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश रामगोंडा पाटील ,राजे बँकेचे व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव ,आप्पासो हुच्चे, सुरेश पिष्टे,महादेव पाटील, अमित पिष्टे,जनार्दन पाखरे, अजित साळुंखे ,प्रवीण काळबर, सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व गणेशभक्त मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते