मुरगूड ( शशी दरेकर ) – राज्यघटनेतील मुल्ये राज्यघटनेच्या निर्मीती पुर्वी गाडगेबाबां स्वतः किर्तनातून मांडत असत आणि ती मुल्ये ते आचरत ही असत. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले . ते वनश्री मोफत रोपवाटिका मुरगूड च्या वतिने आयोजित “निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंती ” कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार हे होते. तर गहीनीनाथ समाचारचे संपादक सम्राट सणगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे, जय शिवराय एज्यु. संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत बहुजन जनजागृतीचे संस्थापक एम टी सामंत, माजी नगरसेवक सुहास खराडे , किरण गवाणकर, सिकंदर जमादार अंनिसच्या सारीकाताई पाटील, सदाशिव एकल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, मार्क्स हा माणूस होता की प्राणी होता हे गाडगेबाबांना कदाचित माहित ही नसेल पण समाजवादी विचारसरणीचा माणूस निर्माण झाला पाहिजे यासाठी संत गाडगेबाबा किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत होते. त्यांनी आपल्या आचार विचारातून मार्क्सवादी समाज रचना निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अर्जुन कुंभार आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, निराधार निराश्रीतांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट वाटप, दिपावलीत साडी फराळ वाटप, वृद्धाश्रयास अन्न धान्य पुरवठा , गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप , रोपवाटीकेतून प्रतिवर्षी रोपांचे मोफत वाटप या उपक्रमातून ‘वनश्री रोपवाटीकेने गाडगे बाबांच्या सेवा कार्याचा वसा जोपासला आहे . वनश्रीच्या वतिने साजरा होणारा गाडगेबाबांच्या जयंतीचा कार्यक्रम हा खरोखरच समाजाला एक प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने गाडगेबाबांच्या कार्याची समाजाला ओळख होते आहे.
यावेळी मुद्रण व्यवसायात बायडिंग काम करणारे कुंडलिक शिवाजी शिंदे , वाकाच्या दोऱ्या वळणारे व वाजंत्री व्यवसाय करणारे श्री वसंत लालू सोनुले, ज्येष्ठ शेतकरी लक्ष्मण सातापा गोधडे, सेवानिवृत आरोग्य विभाग कर्मचारी श्री सुरेश गणपती कांबळे, बाळासो महादेव कांबळे, अरुण दतात्रय कांबळे या सेवाकरी ज्येष्ठांचा शाल फेटा सन्मानपत्र व रोप देवून मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे ( सर ) , माजी एक्साइज ऑफिसर पांडुरंग कुडवे, प्रा. चंद्रकात जाधव, बाजीराव खराडे, संदिप मुसळे, तुकाराम परीट, प्रदिप वर्णे,विकास सावंत, अशोक घुंगरे पाटील, विनायक हावळ , बी आर मुसळे , एन एच चौधरी , जयवंत गोंधळी, अंनिसच्या सारीकाताई पाटील, नगरसेविका प्रतिभा सुर्यवंशी वनश्री रोपवाटीकेच्या संचालिका सौ निता सुर्यवंशी आदीसह शिवराजचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांना झुणका, भाकरी, कांदा प्रसाद म्हणून देणेत आला तर वाढत्या उन्हाचा दाह शमवणारी व पाणी आल्हाददायक बनवणाऱ्या वाळा या औषधी वनस्पतीच्या मुळ्यांचे वाटप करण्यात आले. स्वागत शशिकांत सुतार यांनी , प्रास्ताविक रोपवाटीका संचालक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी, सुत्रसंचालन कु.प्रतिक्षा पाटील यांनी , तर आभार प्रा. महादेव सुतार यांनी मानले.