मडिलगे(जोतीराम पोवार) : वाघापुर तालुका भुदरगड येथे 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी गाव चावडी येथील ध्वजारोहण तलाठी जरग यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर ग्रामपंचायत समोरील पटांगणात ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्री प्रकाश जठार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर विद्या मंदिर वाघापुर प्रशालेतील पटांगणात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी एकल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी वाघापूर हायस्कूल येथील ध्वजारोहण मुख्याध्यापक अशोक मारुती बरकाळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी सरपंच दिलीप कुरडे, उपसरपंच शुभांगी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासो शिंदे, अरविंद जठार, ग्रामसेवक तानाजी शिंदे, पत्रकार जोतीराम पोवार, सचिव दयानंद कांबळे, अर्जून दाभोळे,अंगणवाडी सेविका मदतनीस, प्राथमिक व हायस्कूल चे सर्व शिक्षक वर्ग, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.