व्हनाळी (वार्ताहर) : आनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व व्हीजनस्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने व्हनाळी ता.कागल येथे मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. सरपंच सौ.छाया सुतार,उपसरपंच कस्तुरी निचिते यांच्या हस्ते शिबिराची सुरुवात करण्यात आली.
शिबिरामध्ये २०० लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या व त्यातील 135 नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून अवघ्या साठ रुपयात त्याच दिवशी चष्मे वाटप करण्यात आले. अनंतशांती संस्थेमार्फत गरीब गरजू शेतकरी लोकांच्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 50 हजार लोकांना चष्मे वाटप करण्याचा मानस असून लवकरच तो पूर्ण करत आहोत असे संस्थेचे अध्यक्षा माधुरी खोत व संस्थापक भगवान गुरव यांनी सांगितले. या शिबिरासाठी डॉ.शीतल शिरसाट,श्री.गणेश चिकणे, श्री.गोपाळ पानभरे ,श्री.प्रशांत भुसारी,आनंतशांती संस्थेचे पत्रकार सागर लोहार,जे.के.गोरंबेकर,रमेश पाटील,प्रकाश कारंडे, यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास के.बी.वाडकर, सुरेश मर्दाने, मॅनेंजर तानाजी कांबळे, पांडूरंग कौदांडे, विश्वास पाटील, दिनकर वाडकर, तानाजी सुतार, शरद पाटील, राजू जांभळे, पै.निलेश कडवे, सुधाकर हात्रोटे,संजय निचिते आदी उपस्थीत होते.