शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

कोल्हापूर : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 28 फेब्रुवारीपर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ भरावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

Advertisements

 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अद्यापही ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावरुन सन 2021-22 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी व सन 2020-21 वर्षामधील अर्जांचे नुतनीकरणासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisements

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारी अर्ज छाननी करुन लवकरात-लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावी.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!