कोल्हापूर : दुर्गराज रायगडावर 5 जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने लाखो मावळे देशभरातून येत असतात. यावेळी अमर वाईंगडे यांच्या संकल्पनेतून राज सदर रायगड येथून उपस्थित लाखो शिवप्रेमींना पर्यावरण शपथ देण्यात आली.
गडाच्या पायथ्यापासून ते महा दरवाजा, रोपवे, जिजाऊ साहेब समाधी परिसर, पाचाड सर्व ठिकाणी पर्यावरण संवर्धन व संरक्षण संदर्भात स्लोगन्स अमर वाईंगडे यांच्या वाईंगडे एन्व्हायरो ग्रुप तर्फे लावण्यात आले. यावेळी राज सदरेवरून लाखो शिवभक्तांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व आरो प्लांटची देखभाल व दुरुस्ती वाईंगडे एन्व्हायरो तर्फे करण्यात आली. यावेळी गडावरती प्लास्टिकच्या बॉटल व प्लास्टिक कचरा टाकू नका या संदर्भात जनजागृतीचे काम देखील करण्यात आले.