मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुका पेपर विक्रेता संघटना यांचे वतीने वृतपेपर विक्रेता ‘ व वृत्तपेपर व्यवसायातील कर्मचाऱ्यांना ई – श्रम कार्ड वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मुरगुड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये माजी प्राचार्य व ज्येष्ठ लेखक जीवनराव साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी दिवंगत वृत्तपत्र विक्रेते उत्तम जाधव यांची कन्या कु.सृष्टी उत्तम जाधव हिचा वैद्यकीय व शैक्षणिक खर्चाची संपूर्ण जबाबदारी घेतलेबद्दल कोल्हापूर कॅन्सर केअर सेंटर प्रमुख डॉ.सौ.रेश्मा पवार यांचा कृतज्ञता सत्कार समारंभ झाला.यावेळी वृत्तपत्र विक्रेते, वृत्तपत्र व्यवसायातील कर्मचारी, पत्रकार व वृत्तपत्र फोटोग्राफर यांनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. वृत्तपत्र विक्रेता व वृत्तपत्र व्यवसायातील कर्मचारी यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्यांच्या मागण्याबाबत जीवनराव साळोखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना जीवनराव साळोखे म्हणाले, वृत्तपत्रे ही सर्वसामान्यांचे वैयक्तीक आयुष्य सुखकर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.नवीन माहिती,नवीन शोध ,राजकीय,सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक घडामोडी , स्पर्धा परिक्षाचे मार्गदर्शन ही सर्व माहिती वृत्तपत्रातूनच मिळत असते.त्यामुळे समाज व मानव यांना जोडणारा सकारात्मक दुवा म्हणुन वृत्तपत्र विक्रेते व कर्मचारी या सर्व मंडळीकडे पाहीले पाहिजे.सजग समाजनिर्मितीच्या प्रक्रियेत वृत्तपत्र खुप महत्वाची भूमिका बजावते.वृत्तपत्र विक्रेता व कर्मचारी प्रत्येकाच्या घरापर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम करतो त्यामुळे वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी या सर्व मंडळींचे योगदान आहे.
यावेळी सत्कारमूर्ती डॉ .सौ. रेश्मा पवार,अमर पाटील,तानाजी पाटील ( आदमापूरकर )यानी मनोगत व्यक्त केली.यावेळी डॉ.रेश्मा पवार,माजी प्राचार्य जीवनराव सांळोखे,दैनिक पुढारीचे जनरल मॅनेजर सुनिल लोंढे,अमर पाटील,सचिन बरगे,महेश डकरे,संजय पाटील,संजय आवटी,रामदास भोर,शिवगोंडा पाटील,रघुनाथ कांबळे,किरण व्हनगुत्ते, पत्रकार यांच्यासह-पप्पू बारदेस्कर वृत्तपत्र विक्रेते, वृत्तपत्र कर्मचारी, नागरीक उपस्थित होते .या ई -श्रम कार्ड वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर आभार बाळासाहेब पाटील यानी मानले .