सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : ऐन पावसाळ्यात दुधगंगा नदीने तळ गाठला असून सध्या सिद्धनेर्ली परिसरातील असणाऱ्या नदीकाढावरील गावांना पिण्याच्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नदीपात्रातील पाण्याने तळ गाठला असल्याने पाण्याच्या मोटारी उघड्या पडल्या आहेत. जुलै महिन्यात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी या दिवसात पूर्ण क्षमतेने दुधगंगा नदी वाहत होती.
सध्या नदीमध्ये अगदीच कमी प्रमाणत पाणीसाठी आहे.दुधगंगा नदीकाठी असणाऱ्या गावांनी आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर मोटारी बसविल्या आहेत. मात्र सध्या ह्या मोटार पाण्याविना उघड्या पडल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.गेल्या वर्षी जुलै मध्ये हीच नदी दुधडी भरून वाहत होती. मात्र चालू वर्षी ह्याच महिन्यात ही नदी कोरडी असल्याचे चित्र आहे.
नदीकाढावरील गावांनी सध्या पाणी जपून वापरण्यास सुरवात केली आहे.अनेक गावांत दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे.सध्या पावसाचा म्हणावा तसा जोर नसल्याने नदीमध्ये येणारे पाणी हे अगदी कमी प्रमानात येत आहे.ऐन पावसाळ्यात चालू वर्षी नदी मोकळी असल्याने लोकांच्या मनामध्ये थोडी दुगदूग असल्याचे चित्र आहे.