मडिलगे(जोतीराम पोवार) :
गेली दीड वर्ष बंद असलेली मंदिरे शासन आदेशानुसार आज घटस्थापना दिवशी खुली झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री ज्योतिर्लिंगाचे मंदिर खुले झाल्याने ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविकांतून उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
येथील मंदिर गेले दीड वर्ष कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आल्याने नागपंचमी तसेच दसरा महोत्सव रद्द करावा लागला होता.
नवरात्रीत ज्योतिर्लिंग, विठ्ठल बिरदेव व विठ्ठलाई यांच्या पालखी प्रदक्षिणा बरोबरच जागर या दिवशी भाकणूक ऐकण्यासाठी व गुलाल-खोबरे उजळण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात शासन आदेशानुसार मंदिर खुले झाले असले तरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भाविकांना मंदिरात जात असताना मास्कचा वापर बंधनकारक असून सानिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन चे पालन करावे लागणार असल्याचे स्थानिक देवस्थान सल्लागार समितीचे अध्यक्ष अरविंद जठार यांनी गहिनीनाथ समाचारशी बोलताना सांगितले यावेळी उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे , सरपंच दिलीप कुरडे,पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सचिव रावसाहेब बरकाळे यांच्यासह देवस्थान समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते