कागल(विक्रांत कोरे): अल्पवयीन मेहुणीचे दाजीने चोरून मोबाईलवर शूटिंग घेतले. तुझ्या बहिणीला नांदायला पाठव नाहीतर सदरचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने विरोधात कागल पोलिसात धाव घेतली .त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
किरण देवाप्पा खोत, राहणार विठ्ठल नगर, अंमलझरी, निपाणी जिल्हा बेळगाव ,असे आरोपी दाजी चे नाव आहे.
कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण हा सिद्धनेर्ली येथील आपल्या पत्नीच्या घरी आला होता. दरम्यान त्याने मेहुणीचे चोरून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. ती अल्पवयीन आहे. तुझी बहिण माझ्याबरोबर न आल्यास तू माझ्याशी संबंध ठेव. असे म्हणून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्या दादाजीने केले.
फिर्यादी अल्पवयीन मुलीस तिच्या आईवडिलांनी धीर दिला. घरच्यांनी कागल पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रसाळ हे पुढील तपास करीत आहेत.