
मुरगूड ( शशी दरेकर ) : विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचे योगदान आहेच त्याशिवाय समाजाच्या जडणघडणीत सुध्दा योगदान अतुलनीय आहे . त्यांनी दिलेल्या सुसंस्कारातून भारताची नवी पीढी समृध्द होईल असे प्रतिपादन माजी प्राचार्य रामचंद्र सातवेकर यांनी केले.
येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विरंगुळा केंद्रामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी रामचंद्र सातवेकर बोलत होते . अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगराव चौगले होते.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांनी स्वागत केले . जयवंत हावळ यांनी प्रास्ताविक केले .
या प्रसंगी प्रकाश पाटील पांडुरंग पाटील दलितमित्र डी डी चौगले आदिंनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास शिवाजीराव सातवेकर, सखाराम सावर्डेकर,’सदाशिव एकल , महादेव वाघवेकर ,तुकाराम भारमल, रणजित सासणे, प्रदीप वर्णे आदि उपस्थित होते सिकंदर जमादार यांनी आभार मानले .
It’s clear that you are passionate about making a positive impact and your blog is a testament to that Thank you for all that you do
As a fellow blogger, I can appreciate the time and effort that goes into creating well-crafted posts You are doing an amazing job