मुरगूड ( शशी दरेकर ): शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेली कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांनी पतसंस्था सहकार क्षेत्राला दिशादर्शक आहे. संस्थेच्या माध्यमातून नऊ हजार ६०० सभासदांना सर्व सुविधा दिल्या जात असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन सचिन शिंदे यांनी केले.
(को. जि.मा.शि. ) पतसंस्थेच्या मुरगूड शाखेच्या दुसऱ्या मजल्याचा बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या इमारत फंडातून सुमारे ३५ लाख रुपये खर्चून दोन हजार स्क्वेअर फुट जागेत हे बांधकाम होणार आहे. मुरगूड शाखेशी सलंग्न असलेल्या ३९ शाळांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ झाला .
चेअरमन शिंदे म्हणाले, नऊ हजार ६०० सभासद व ठेवीदारांच्या विश्वासावर संस्थेने सहाशे ३५ कोटीच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. सभासद कर्जमुक्ती योजना, उच्चांकी लाभांश , दीपावली भेट, कन्यादान साडी योजना,कन्या जन्म ठेव योजना यासह सभासद लाभाच्या योजना सुरू आहेत. या दीपावलीपासून सभासदां साठी प्रासंगिक कर्ज ( पाच लाख ) व आकस्मिक (१ लाख ) कर्जाचा व्याजदर नऊ टक्के करण्यात आला आहे.
बांधकाम शुभारंभ कार्यक्रमास शाखा चेअरमन अविनाश चौगले, जेष्ठ संचालक राजेंद्र रानमाळे, पांडुरंग हळदकर, संस्था सीईओ जयवंत कुरडे यांच्यासह माजी संचालक अरविंद किल्लेदार मुख्याध्यापिका धनश्री कोंडेकर ( गोरंबे), मुख्याध्यापिका भारती सुतार (विजयमाला गर्ल्स हाय.मुरगूड), मुरगूड विद्यालयाचे प्राचार्य शाम पाटील, शिवराज विद्यालयाचे प्राचार्य व्ही.बी.खंदारे, महालक्ष्मी हाय लिंगनूरचे प्राचार्य एम.आर.पाटील, प्राचार्य एस.बी.भाट , मुख्याध्यापक रामदास जगदाळे (मुगळी),प्राचार्य ए.एम.पाटील ( मळगे ), मुख्याध्यापक अशोक पाटील (भडगाव ) , मुख्याध्यापक सुधीर कांबळे ( बेलेवाडी .मासा), मुख्याध्यापक टी. जी. पाटील ( कौलगे), मुख्याध्यापक पांडुरंग भोसले (सावर्डे),मुख्याध्यापक संतोष कुडाळकर (हळदी) मुख्याध्यापक एम. आय.कांबळे ( बोळावी) , उपमुख्याध्यापक प्रवीण सुर्यवंशी, माजी उपप्राचार्य एस. एन. आंगज , उपप्राचार्य ई. व्ही चौगले, प्रा. बसप्पा मडिवाळ,पांडुरंग लोकरे, (मुरगूड) . प्रकाश शिंदे (यमगे ), प्रा. महादेव सुतार, मुरगूड शाखा समिती सदस्य शिवाजी गोल्हार, दत्तात्रय लोखंडे, जयसिंगराव देशमुख, अभिजीत पाटील ,माजी शाखा समिती सदस्य दत्तात्रय मोरबाळे, संजय कदम, सुनिल माजगावकर, राजेंद्र पाटील,शंकर रामसे, डी.एम.सागर (कुरुकली) ,पत्रकार रवींद्र शिंदे, वसंतराव कोंडेकर, इंजिनीयर मयूर आंगज, शाखाधिकारी उदय पाटील, विनायक हजारे, सुशांत डवर , रविंद्र पाटील, राहूल घरपणकर व ब्रिजभूषण पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक शाखा चेअरमन अविनाश चौगले यांनो केले.जेष्ठ संचालक राजेंद्र रानमाळे यांनी आभार मानले.