मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ पत्रकार व ” गोवऱ्या आणि फुले ” या आत्मचरित्राचे लेखक मा . श्री . चंद्रकांत माळवदे ( सर ) यानां दुसरा राज्यस्तर पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा भा.ज.पा. नेते व कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष मा .समरजितसिंहराजे घाटगे यानीं लेखक चंद्रकांत माळवदे यांच्या निवासस्थानीं सदिच्छा भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील साहित्यीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शैलेश माळवदे , डॉ . हृषीकेश माळवदे , सौ . भारती माळवदे , सौ . दिपाली माळवदे , डॉ .सौ. धनश्री माळवदे, यानी समरजितसिंहराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले .
या सदिच्छा भेटीप्रसंगी दत्तामामा खराडे , अनंत फर्नांडिस , संतोष गुजर , राजू फर्नांडिस , संजय एकल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!