पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती बद्धल अनिल देवळे यांचा सत्कार


मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड   येथील अनिल अशोक देवळे यांचा पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्धल राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
          या सत्कार कार्यक्रम माजी प्राचार्य , व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला . यावेळी राष्ट्रीय खेळाडू अजित गोधडे , करण मांगले , अमित साळोखे , सुहास भारमल , ओंकार लोकरे यांच्या हस्ते अनिल देवळे यांचा सत्कार करण्यात आला.
           यावेळी पोलीस निरीक्षक अनिल देवळे यांनी जीवनात नोकरी बरोबरच चांगल्या आरोग्यासाठी अभ्यासा बरोबरच खेळावर लक्ष केंद्रीत करा असा मौलिक सल्ला खेळाडूंना दिला.
यावेळी व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर यांनीही खेळाचे जीवनातील महत्व सांगितले.

Advertisements

            यावेळी संभाजी मांगले, जनार्दन भाट, हर्षद चौगले , रणजीत मोहिते, ओंकार चौगले, श्रावण कळांद्रे, करण भोसले , अजित गुरव, सागर पाटील, सुनील साळोखे , तानाजी डोंगरे , निखील सावंत उपस्थित होते. स्वागत संभाजी मांगले यांनी तर आभार विनोद रणवरे यांनी मानले.

Advertisements
AD1

2 thoughts on “पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती बद्धल अनिल देवळे यांचा सत्कार”

Leave a Comment

error: Content is protected !!