मुरगूडच्या श्री. व्यापारी पतसंस्थेतर्फे टाटा पंच फोर व्हीलर गाडीचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे संस्थेचे निकटवर्ती मा. श्री. रंगराव विठ्ठल पाटील रा. सुरुपली यांना नवीन फोर व्हीलर ” टाटा पंच” गाडीचे वितरण करण्यात आले.

Advertisements

श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री . किरण गवाणकर यांच्या शुभहस्ते टाटा पंच गाडीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. पूजनानंतर गाडीची चावी मा. श्री. रंगराव पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

Advertisements

या टाटा पंच गाडीच्या वितरण प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री किशोर पोतदार , प्रशांत शहा , शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, हाजी धोंडीराम मकानदार, साताप्पा पाटील, निवास कदम, प्रदिप वेसणेकर, संदिप कांबळे, संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, रणजीत मोरबाळे, संस्थेचे कर्मचारी वर्ग, सभासद उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!