कोल्हापूर : आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाजाचे स्टार्टर स्वीच अचानक शॉर्ट होवून गेट आपोआप सुरू झाल्याने दरवाजा उघडून नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग सुरू झाला. त्यामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात साधारणत: 3 ते 4 फूटाने वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी व्यक्त केला.
स्टार्टर स्वीच अचानक शॉर्ट होवून गेट आपोआप सुरू झालाची शक्यता तंत्रज्ञानांनी व्यक्त केली असून आज दिवसभरात कोणत्याही परिस्थितीत गेटची दुरुस्ती पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली असून या दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत.
सध्या के .टी. वेअरचे पिलर काढण्याची सूचना संबंधितांना दिली आहे. त्याचबरोबर नदीतील पाणी वाढणार असल्याने नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठावरील गाव, नदीवर जनावर, धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे. आज दिवसभरात या दरवाज्याची संपूर्ण दुरुस्ती करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे
– अधिक्षक अभियंता महेश सुर्वे