साके(सागर लोहार): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय,विविध कार्यकारी सोसायट्या, शाळा, महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी मान्यवरांनी माहिती सांगितली. त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
ग्रामपंचायत साके ता.कागल येथे महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिमापुजन तालुका संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरंबे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मारूती निऊंगरे,चंद्रकात निऊंगरे, सरपंच सुशिला पोवार,उपसरपंच निलेश निंऊंगरे,सी.बी.कांबळे,आक्काताई चैागले,तेजस्विणी पाटील,बाजीराव पाटील,मोहन गिरी,सुजय घराळ,विश्वास जाधव,सागर पाटील ग्रामसेवक संजय पाटील,तलाठी सुनिल भातमारे,सेविका जयश्री निऊंगरे,शोभा जाधव,आनंदी पाटील,उज्वला जाधव आदी उपस्थीत होते.
कै.सैा.सुभद्रामाता आशिर्वाद माध्यमिक विद्यालय साके येथे महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमापुजन मुख्याध्यापक बी.डी.हाळदकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापक टि.व्ही.पाटील,डि.एस.पाटील,तानाजी सांमत,पी.एच.पाटील,व्हि.ए.राऊत,दामले मॅडम,बाळासो पोवार आदी उपस्थीत होते. विद्या मंदिर साके येथे महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक भावूदास पोवार,विजय पाटील,दता पाटील,संभाजी आसबे,नामदेव पाटील,प्रकाश मगदूम,आदी उपस्थीत होते.