मुरगूड जेष्ठ नागरीक संघात जागतिक अभियंता दिन उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल “मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात ” आपल्या योगदानाने देशात इंजिनिअरींगच्या तंत्रज्ञानाचा पाया ज्यांनी घातला त्या भारतरत्न विश्वेश्वरैया यांची जयंती ” अभियंता दिन ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . शाहू फर्नांडिस हे होते . प्रारंभी संचालक एम … Read more

कागल औद्योगिक वसाहती जवळ एका परप्रांतीय व्यक्तीचा खून

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील कसबा सांगावच्या हद्दीत पंचतारांकित औद्योगिक वसाहती जवळ एका परप्रांतीय इसमाचा खून झाला आहे .खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु सदरचा खून अनैतिक संबंधातून की इतर कोणत्या कारणातून झाला असावा याचा शोध कागल पोलीस घेत आहेत .खुनाची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे .विकास सिंह राहणार मध्य … Read more

बारामती येथिल इंजनिअर ” प्रदिप साळोखे  ” यांचा ३१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल भाट गल्ली राणा प्रताप चौक येथिल राहणारे प्रदिप महादेवराव साळोखे यांचा ३१वाढदिवस हॉटेल राजवाडा भिवशी येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला . प्रदिप साळोखे हे डायनामिक्स प्रोडक्सन कंपनीत९ वर्षे बारामती येथे कार्यरत आहेत . त्यांच्या वाढदिवसानिमित्य अनेक नातेवाईकानीं, व मित्रपरिवारा नि  त्यानां शुभेच्छा देऊन त्याना दिर्धायुष्य चितून … Read more

मुरगूडच्या शिवराज विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ विजयी

मुरगूड ( शशी दरेकर ) : बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .           बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालयाच्या संघाने पहिल्या सामन्यात … Read more

मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा स्पर्धेत श्री. दौलतराव निकम विद्यालय कागलमध्ये प्रथम

सुळकूड ( प्रा.सुरेश डोणे) : शालेय विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा,  गुणवत्ता विकास, राज्य व राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि शालेय-सहशालेय विविध उपक्रमांच्या जोरावर श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर(ता.कागल) या माध्यमिक प्रशालेने “मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा” या उपक्रमात कागल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून ३ लाख रुपये पारितोषिक मिळविले.              प्रशालेची जिल्हास्तरीय … Read more

नोकरीच्या आमिषाने ७ लाखांची फसवणूक !

गोकुळ शिरगाव: कणेरीवाडी हद्दीतील एका हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची 7 लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी आशिष वरांबळे, किरीटकुमार पटेल आणि गजानन देशपांडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.           संशयितांनी लंडनमध्ये फूड लॉजिस्टिक कंपनी आहे आणि त्यासाठी नोकर भरती चालू आहे असे सांगून सेमिनार घेतले. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून … Read more

मुरगूड परिसरातील घरगुती गौरी – गणपतीनां उत्साहाच्या वातावरणात निरोप

मुरगूड( शशी दरेकर ) : मुरगूड परिसरात घरगुती गौरी गणपतीचे उत्साही वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आले ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला फटाक्याची आतषबाजी करीत आपल्या गणरायाला निरोप दिला. पाऊस नसल्याने गणपती विसर्जनामध्ये उत्साह दिसून येत होता. परिसरातील काही सार्वजनिक मंडळांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले .टाळ मृदंग ,भजन … Read more

कागल व परिसरातील १४ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कायद्याचे उल्लंघन कागल (विक्रांत कोरे) : कागल व परिसरातील गणेश मंडळांकडून ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कायद्याचे उल्लंघन  झाले आहे .अशा एकूण 14 गणेशोत्सव मंडळांवर कागल पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे प्रचलित कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.            कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी प्रसिद्धीस … Read more

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

कागल (विक्रांत कोरे): कागल मध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक किलो 324 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे .जयपाल परमेश्वर सिंग ,वय वर्षे चाळीस राहणार इस्लामपूर पोस्ट माहेश्वरी बिजनोर उत्तर प्रदेश सध्या राहणार नेर्ली तालुका करवीर. आर्यन रमेश कांबळे वय वर्षी 19 राहणार शिवाजी चौक कागल अशी अटक केल्या … Read more

गगनबावडा महाविद्यालयात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “विज्ञान, व्यवसाय आणि मानव्यशास्त्र या विद्याशाखांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहयोगी नवकल्पना (ICBGCI-2024)” या मुख्य विषयावर शोधनिबंध सादरीकरण व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. यामध्ये व्यवसाय/व्यवस्थापन, वाणिज्य, जीवशास्त्रे, रसायनशास्त्र, गणित, … Read more

error: Content is protected !!