मुरगूड नागरी सह. पतसंस्थेचा मुरगूडमध्ये शानदार उदघाटन सोहळा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे सरपिराजी रोड, बँक ऑफ इंडीया शेजारील इमारतीमध्ये ” मुरगूड नागरी ” सहकारी पतसंस्थेचा शानदार उदघाटन सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार ह . भ .प. डॉ . श्रीकृष्ण देशमुख ( काका ) यांच्या शुभहस्ते फित कापून हा उदघाटन सोहळा पार पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. … Read more

Advertisements

चुलत जाऊबाईने केली फसवणूक, दीड लाखांची फसवणूक

गोकुळ शिरगाव(सलीम शेख): कंदलगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. माया कृष्णात पाटील यांना त्यांची चुलत जाऊबाई सुप्रिया अमर पाटील यांनी फसवले आहे. लग्नात दिलेले सोन्याचे दागिने नकली असल्याचे उघडकीस आले आहे. माया पाटील यांनी सुप्रियाला लग्नात अडीच तोळ्यांचा नेकलेस, दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार आणि साडेतीन तोळ्यांचा राणी हार दिला होता. नंतर यापैकी नेकलेस आणि राणी … Read more

थकीत वीज बिल मागितले म्हणून केली मारहाण

मोबाईल ही फोडला कागल (विक्रांत कोरे) : थकीत वीज बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या वीज तंत्रज्ञास शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. मोबाईलची मोडतोड केली. म्हणून कागल पोलीस ठाण्यात वीज मंडळाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना बेलवळे खुर्द तालुका कागल येथे सकाळी 11 वाजण्या सुमारास घडली. कृष्णात महादेव पाटील राहणार बेलवळे खुर्द तालुका कागल असे … Read more

कागलच्या प्रताप नागरी पतसंस्थेचा 12 टक्के लाभांश घोषित

कागल : जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या प्रताप नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना दीपावलीचे औचित्य साधून 12 टक्के लाभांश (डिव्हीडंट) तसेच सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देखील दिला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बिपीन यशवंतराव माने यांनी दिली         यावेळी उपाध्यक्ष विजय मंत्री, व्यवस्थापक  व्ही टी  पाटील,  संचालक सुनील माळी, संजय … Read more

कागल अपघातात एक मयत

कागल(विक्रांत कोरे): भरधाव वेगाने मोटरसायकल चालवून रस्त्यावरील घोड्याला ठोकरले .याअपघातात मोटरसायकल वरील इसम गंभीर जखमी होऊन मयत झाला .ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास, कागल-निढोरी मार्गावर, बामणी येथे घडली .तानाजी चंद्रकांत हजारे, वय वर्षे – 61 ,राहणार- मडिलगे खुर्द ,तालुका -भुदरगड, जिल्हा -कोल्हापूर, सध्या राहणार- प्राध्यापक कॉलनी जवळ, कृष्णराव सोसायटी, आपटे नगर ,कोल्हापूर. असे मयत … Read more

नवाळे समूहाच्या दूधसंस्थेच्या बोनस वाटप

पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द येथील नवाळे समूहाच्या दूध संस्थेच्या बोनस वाटप कार्यक्रम संपन्न झाला .समूहाच्या वतीने श्री इंदिरा सहकारी दूध संस्था, श्री कृष्णामाई महिला दूध संस्था ,आणि अशोकराव नवाळे दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक व कर्मचारी यांना उच्चंकी बोनस वाटप संस्थेच्या संस्थेचे अध्यक्ष अशोक नवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेमार्फत म्हैस  दूध खरेदीवर … Read more

गोकुळ शिरगाव येथे भीषण बस दुर्घटना, एकाचा मृत्यू

गोकुळ शिरगाव:(सलीम शेख) – पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव येथे शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास एका खासगी बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एक प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी प्रवासी बेळगावहून कोल्हापूरकडे जात होते. मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष … Read more

कागल येथे अपघातात एक व्यक्ती ठार

कागल (विक्रांत कोरे) : कागल येथे झालेल्या अपघातात 52 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास, राज्य महामार्गावर कागल एसटी आगारा समोरच्या वळणावर घडला.     सुभाष सहदेव कांबळे राहणार मुळगाव शिवडाव ,तालुका- भुदरगड .सध्या राहणार -गारगोटी असे मयत इसमाचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार मयत सुभाष कांबळे हा कोल्हापुर येथे आपले मार्केटिंगचे काम … Read more

गडमुडशिंगी येथे नरसिंह मंदिर विहिरीत कोसळले

पुजारी पण त्यावेळी मंदिरात कोल्हापूर(सलीम शेख) : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील नरसिंह मंदिर विहिरीत कोसळल्याने मंदिर आणि त्यात पूजा करीत असलेले पुजारी कृष्णात उमराव दांगट (64) हे विहिरीत पडून गेले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने विहिरीच्या काठावरील जमीन कमजोर झाली … Read more

कागल पोलिसांनी पकडला गुटखा

एक लाख  दोन हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त कागल (विक्रांत कोरे) : महाराष्ट्रात गुटख्याची बंदी असताना देखील कर्नाटकातून विक्रीसाठी वाहतूक करत सुमारे एक लाख  दोन हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल कागल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई कागल  तालुक्यातील शेंडूर फाटा येथे दुपारी बारा वाजण्याचे सुमारास करण्यात आली. अजय भाऊसो पाटील, वय वर्षे 30, … Read more

error: Content is protected !!