विज्ञान दिनानिमित्य सिद्धनेर्ली विद्यालयात विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन

सिध्दनेर्ली : येथील सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन सम्पन्न झाले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विज्ञान आकृतींच्या संकल्पना स्पष्टीकरणासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेतल्याचे विज्ञान प्रमुख संदीप वर्णे यांनी सांगितले. या अनोख्या प्रदर्शनामध्ये 27 विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सादर केली 550 विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहून वैज्ञानिक दृष्टीकोन … Read more

मुरगूड येथील सकल मराठा समाजाचा खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणास पाठिंबा

मुरगूड ( शशी दरेकर ): मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शनिवारपासून खा. संभाजीराजे मुबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी समाजबांधव कोल्हापुरात साखळी उपोषणास बसले आहेत या आंदोलनास पाठिंबा म्हणून मुरगूड येथील सकल मराठा समाज आणि मुरगूड शहरातील नागरिकांनी फेरी काढून बस स्थानकाजवळ बैठे आंदोलन केले. एक मराठा लाख मराठा ,मराठा आरक्षण आमच्या … Read more

करनूर येथून पितळी बंब चोरीस

कागल ( विक्रांत कोरे): करनूर ता. कागल येथून पाणी गरम करण्याचे पितळी दहा बंब चोरीस गेले. हा प्रकार रविवार दि. 27 रोजी रात्री च्या दरम्यान घडला.चोरीचे ब-याच दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकातून भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन वर्षापासून करनूर मध्ये कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या चोरीचे सत्र चालू आहे. यामध्ये दोन ते तीन जातिवंत म्हैशी … Read more

अवचितवाडी येथे ” स्वराज्य महोत्सव २०२२ ” स्पर्धेत नंदा गायकवाड मानाच्या पैठणीच्या मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : अवचितवाडी ( ता. कागल ) येथे स्वराज्य महोत्सव २०२२मध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या . यामध्ये . सिनेअभिनेते मदन पलंगे यांच्या खेळ खेळुया मानाच्या पैठणीचा कार्यक्रम महिलांच्या तोबा गर्दीत घेण्यात आला.होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी नंदा गायकवाड ठरल्या. तर दुसरा -अंजना शिंदे , तिसरा -तृप्ती भारमल … Read more

मायबोली मुळे दऱ्या-खोऱ्यातील शिळानां जाग येते – उपप्राचार्य एस. पी. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) : अमृताहून मधुर असा जिचा गौरव संत ज्ञानेश्वर माऊलींनी केला; जी आमुची मायबोली आहे; जिच्या संगतीने दऱ्या खोऱ्यातील शिळांना जाग येते अशा भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या मराठी भाषा अद्याप ही अभिजात दर्जाच्या प्रतिक्षेत आहे. या भाषेला हा दर्जा प्रदान करुन ती ज्ञान भाषा व्हावी. असे मत मुरगूड विद्यालय … Read more

छत्रपती संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणाला करनूर येथील सकल मराठा समाजाचा पाठिंबा देऊन एक दिवसाचे साखळी उपोषण

कागल( विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असणाऱ्या आमरण उपोषणास पाठिंबा देऊन, सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून उपोषणास सुरुवात करण्यात आले. करनूर … Read more

नवाब मालिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – समरजितसिंह घाटगे

कागल(प्रतिनिधी): मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकर यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट करण्यासाठी वापरले हे कृत्य देशद्रोही आहे . त्यामुळे नवाब मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायला हवा. मालिकांचा राजीनामा जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे दिला. ते पुढे म्हणाले, मंत्री अनिल देशमुख यांच्यावर … Read more

राज्यस्तरीय गोसावी समाज टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शुभारंभ

कागल (प्रतिनिधी) : गोसावी समाज, कागल यांच्या वतीने राज्यातील गोसावी समाज यांच्या टेनिस बाॕल क्रिकेट स्पर्धा राजर्षी शाहू स्टेडीयम, कागल येथे आयोजित केलेल्या आहे. टेनिस बाॕल क्रिकेट स्पर्धा यांचे उद्घाटन करते वेळी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस शहराध्यक्ष संजय चितारी, विलास कालेकर, दस्तगीर पठाण, विक्रम गोसावी, नायक गोसावी, युवराज मकवाने व इतर सर्वजण उपस्थित होते.

मी मंत्री पदाचा उपयोग गरीब जनतेसाठी केला – नामदार हसन मुश्रीफ

कागल (विक्रांत कोरे) : मी पाच वेळा आमदार व वीस वर्षे मंत्री झालो.पण मंत्रिपदाच्या माध्यमातून लोककल्याणकारी कामे व गोरगरीब जनतेचे हित जोपासण्याचे काम केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. लिंगनूर दुमाला ता. कागल येथील सात कोटी च्या विविध विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे … Read more

27 फेब्रुवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करूया – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरोघरी भेट देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे … Read more

error: Content is protected !!