कागल तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी आनंदराव पाटील यांची निवड

कागल : येथील तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षपदी अँड. आनंदराव पाटील, उपाध्यक्षपदी अँड. बजरंग म्हसवेकर, सचिवपदी अँड. अभिजित सांगावकर, सहसचिवपदी अँड. मीनाक्षी जाधव आणि महिला प्रतिनिधी म्हणून अँड. कांचन खंदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडप्रसंगी कागल वकील संघटनेचे सिनिअर व जुनिअर वकील उपस्थित होते. मावळते अध्यक्ष … Read more

Advertisements

डी. आर. माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा 92 टक्के निकाल

कागल / प्रतिनिधी : येथील डी आर माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 92 टक्के लागलेला आहे. या परीक्षा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या होत्या. शाखा निहाय निकाल पाहता विज्ञान शाखा 100 टक्के,वाणिज्य शाखा 96.55 टक्के, कला शाखा 75.2 टक्के,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम 96.05 टक्के या महाविद्यालयाने चांगलीच गुणवत्ता प्राप्त केली आहे. शाखा निहाय अनुक्रमे उत्तीर्ण … Read more

राजर्षी शाहूरायांनी ज्ञानाची मत्तेदारी मोडून काढली

बहुजन समाजाच्या उद्धाराचे कंकण हाती बांधणारे सामाजिक क्रांतीची प्रेणेते महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत सर्व समाज सुधारकांनी शिक्षण ही सुधारणांची ‘किल्ली’ मानली होती. शिक्षण म्हणजे विद्या, ज्ञान तिच्यापासून शेकडो वर्ष बहुजन समाज वंचित राहिला. त्यामुळे दारिद्र्य आणि अज्ञान या गर्तेत अडकून पडला. … Read more

कागलजवळ लक्ष्मी टेकडी येथे ट्रक पलटी, अपूर्ण रस्त्यामुळे अपघात

कागल (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर महामार्गावरील कागलजवळील लक्ष्मी टेकडी येथे आज पहाटे चार वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून बेंगलोरकडे निघालेला कुरिअर वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आणि ब्रेक निकामी झाल्यामुळे पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक किशन गुप्ता (वय २८) सुदैवाने बचावले आहेत, मात्र ट्रकमधील कुरिअर सामानाचे मोठे नुकसान झाले. पुणे-बेंगलोर महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू … Read more

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात परिसंवादांची भूमिका मोलाची – मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. 24 : आर्थिक साक्षरतेमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सकारत्मक निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांना आर्थिक गुंतवणूक कशी करावी अत्याधुनिक साधनांचा दैनंदिन व्यवहारात वापर कसा करावा, यासाठी सशक्ती परिसंवाद 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात अशा परिसंवादांची भूमिका … Read more

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी 10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

मुंबई : महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. 10, 13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यात 45 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून, https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे. संरक्षण अधिकारी गट-ब (अराजपत्रित)  दोन … Read more

ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे क्षण यावेत – गजाननराव गंगापूरे

मुरगूड ( शशी दरेकर ) – आईवडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. जो सेवा करतो त्यालाच पुण्य मिळते . आजच्या जगात ज्येष्ठांचा आदर मान राखण्याची आवश्यकता आहे त्यांच्या जीवनात सुखाचे व आनंदाचे क्षण निर्माण करून देणे हे सामाजिक काम व कर्तव्य आहे असे प्रतिपादन मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांनी केले. … Read more

अजित पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड शहरातील अजित नामदेवराव पाटील (भडगावकर ) यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. श्री अजित पाटील हे जनता सहकारी बॅकेचे माजी व्हाईस चेअरमन व येथील व्यापारी नागरी सहकारी पत संस्थेचे संचालक  नामदेवराव पाटील (एन् के )यांचे चिरंजीव होत.          या निवडी कामी श्री पाटील यांना  खासदार धनंजय महाडीक … Read more

ऊस शेतीत सहज हाताळता येणारी छोटी यंत्रे विकसित होणे आवश्यक – समरजितसिंह घाटगे

व्हीएसआयच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीची ‘शाहू’स भेट कागल (प्रतिनिधी) : खात्रीशीर उत्पादनाची हमी असलेल्या ऊस  शेतीतील मजूर टंचाईवर मात करण्यासाठी सहज हाताळता येणारी छोटी यंत्रे विकसित होणे आवश्यक आहे.असे स्पष्ट मत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.   सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या पुणे येथील व्हीएसआयच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने कागलच्या शाहू साखर कारखान्यास … Read more

कागल येथील सीमा तपासणी नाका आजपासून कार्यान्वीत

कोल्हापूर (जिमाका):  प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील कागल येथे महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि. या शासन नियुक्त सेवापुरवठादाराकडून संपूर्णपणे आधुनिक व संगणकीकृत सीमा तपासणी नाका उभारण्याची कार्यवाही पुर्ण झाली असून मंगळवार 10 डिसेंबर 2024 पासून कागल येथे सध्या कार्यरत असलेल्या तपासणी नाक्याऐवजी नव्याने स्थापित झालेला व संपूर्ण आधुनिकीकरण, संगणकीकरण झालेला सीमा तपासणी नाका कार्यान्वीत … Read more

error: Content is protected !!