निधन वार्ता
निधन वार्ता – श्रीमती पार्वती शिवा हळदकर
मुरगुड ता. कागल येथील श्रीमती पार्वती शिवा हळदकर ( वय ९७ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. श्री. महादेव हळदकर यांच्या त्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश हळदकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे . रक्षाविसर्जन बुधवार दिनांक २/४/२०२५रोजी मुरगुड येथे आहे .
कागलमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराने २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू
कागल (प्रतिनिधी): कागल येथील २४ वर्षीय तरुणी आद्या विश्वजीत संकपाळ हिचा डेंग्यूसदृश्य आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. आद्या ही चायनीज भाषेची अभ्यासक आणि भूगर्भशास्त्रात बीएससी पदवीधर होती. तिच्या निधनाने कागल परिसरात शोककळा पसरली आहे. आद्याला गुरुवारी अशक्तपणा आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेंग्यूसदृश्य लक्षणे दिसत असल्याने डॉक्टरांनी तिला कोल्हापूर येथील … Read more
सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता बामणे यांना मातृशोक
कोल्हापूर (प्रा.सुरेश डोणे) : संभाजीनगर-कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता नारायण बामणे यांच्या मातोश्री श्रीमती अक्काताई नारायण बामणे (वय-८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उत्तरकार्य शनिवार दिनांक २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गणेश मल्टीपर्पज हॉल, हॉटेल वाडा संस्कृती समोर नाळे … Read more
पांडुरंग चांदेकर यांचे निधन
मुरगूड : बिद्री साखर कारखान्याचे सेवानिवृत्त शेती अधिकारी पांडुरंग कृष्णा चांदेकर (वय वर्षे ७९ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील डॉक्टर शिवाजी चांदेकर यांचे ते वडिल होत. रक्षाविसर्जन रविवार दि. ९ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला प्रमुख अन्नपुर्णा विठ्ठलराव चव्हाण यांचे निधन
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला प्रमुख अन्नपुर्णा विठ्ठलराव चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या वयाच्या ८७ व्या वर्षी निधन पावल्या. अन्नपुर्णा चव्हाण हे माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी होत्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे योगदान अनमोल राहिले आहे. खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याचा केंद्रबिंदू व्ही. वाय. चव्हाण यांचे खानापूर … Read more