निधन वार्ता – शांताबाई रणवरे

मुरगूड ता. कागल (भोई गत्ली) येथील श्रीमती शांताबाई अनंत रणवरे (वय ७७) यांचे बुधवार दि .१३ / ८ / २०२५ रोजी पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  माजी नगरसेवक सुनिल रणवरे ( सर ) तसेच न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली ता. कागल शाळेचे कलाशिक्षक मोहन रणवरे तर मुरगूड नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक विनायक रणवरे यांच्या … Read more

Advertisements

निधन वार्ता : श्रीमती इंदूताई महादेव खैरे यांचे निधन

मुरगूड येथील श्रीमती इंदूताई महादेव खैरे ( वय ८७ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. निवृत अभियंता सुरेश खैरे यांच्या त्या आई होत.

निधन वार्ता : रामराव सासणे यांचे निधन

मुरगूड येथील शिवचरित्र व्याख्याते व दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे जूने सहकारी रामराव बाबुराव सासणे (वय ८७ ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे  पत्नी, दोन मुले, भाऊ, सूना व नातवंडे असा परिवार आहे. ॲड राणाप्रताप सासणे यांचे ते वडिल होत.

निधन वार्ता : श्रीमती हौसाबाई मारुती भूते

मुरगूड :मुरगूड येथील श्रीराम मंगल कार्यालय व भूते बंधू मंडप डेकोरेशनचे मालक रामचंद्र व विठ्ठल भूते यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई मारुती भूते (वय ८३ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

निधन वार्ता : मधुकर दत्तात्रय अर्जुने

मुरगूड येथील सेवानिवृत एसटी कर्मचारी मधुकर दत्तात्रय अर्जुने (वय ७२ ) यांचे ऱ्हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई ‘ पत्नी मुलगा नातू दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

निधन वार्ता – प्रमिला रेंदाळे

मुरगूड ता. कागल येथिल प्रमिला महादेव रेंदाळे ( वय ७५ ) यांचे रविवार दि. २२ जून २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. डॉ. महादेव रेंदाळे यांच्या त्या पत्नी तर सराफ व्यावसाईक बाबूराव रेंदाळे, आकाश रेंदाळे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जण व उत्तरकार्य सोमवार दि. … Read more

निधन : एम. व्ही. कांबळे

मुरगूड,ता.८ : येथील दलितमित्र एम.व्ही.कांबळे (वय ७९ ) यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी होत. त्यांच्या मागे,पत्नी, मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.९) आहे.

निधन वार्ता – यशवंत पोवार

श्रीपेवाडी ता. निपाणी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत जानबा पोवार ( वय ८९ ) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. ८/६/२०२५ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन मुली , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ९/६/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्रीपेवाडी येथे आहे.

निधन वार्ता – श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील

श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील मुरगूङ याचे वार्धक्याने दिनांक २१.५ .२०२५ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मुरगूड येथिल शिवगड अध्यात्मिक ट्रस्टचे खजिनदार व इंजिनिअर बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्र्चात दोन मुले,दोन मुली नातवंडे सुना असा परिवार आहे,रक्षा विसर्जन रविवारी सकाळी ९ वा आहे.

निधन वार्ता – अलका  तांबट

मुरगूड – मुरगूड येथील  अलका महादेव तांबट (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मुरगुडच्या श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक व मुरगूड बाजारपेठ येथिल राज सायकल दुकानचे मालक महादेव तांबट यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुले, सून, मुलगी, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षविर्सजन रविवार दिनांक ४ मे रोजी दत्त … Read more

error: Content is protected !!