12 ते 18 डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनायलय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, खासबाग मैदान, कोल्हापूर येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 डिसेंबर रोजी योगा, 13 डिसेंबर रोजी लगोरी, लिंबू चमचा व संगीत खुर्ची, 14 डिसेंबर … Read more

जिल्हास्तरीय सैनिक तक्रार निवारण समिती सदस्य नेमणुकीसाठी इच्छुकांनी नावे नोंदवावीत

कोल्हापूर(जिमाका): जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिकांच्या तक्रार निवारणासाठी समिती स्थापन करावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून इच्छुक सदस्यांनी आपली नावे कार्यालयीन मोबाईल क्रमांक 9172035612 या व्हॉटसअप वर नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.        प्रत्येक तालुक्यातुन एका सदस्याची निवड करायची आहे. तथापि प्रत्येक तालुक्यातून एक पेक्षा जास्त … Read more

ॲग्रीस्टॅक प्रकल्प यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांची नावनोंदणी वेळेत व अचूक करा – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर (जिमाका): ॲग्रीस्टॅक प्रकल्प यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीचे काम वेळेत व अचूक करा. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने समन्वयातून पूर्ण करावीत, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या.      ॲग्रीस्टॅक प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत प्रभारी जिल्हाधिकारी श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

शिरोली येथे भीषण अपघात: महामार्गावरून सेवा मार्गी वर ट्रक कोसळला

शिरोली(सलीम शेख): शिरोली येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मयूर फाट्याजवळ गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक मालवाहतूक ट्रक महामार्गावरून अंदाजे 15-20 फूट खाली सेवा मार्गावर कोसळला. सकाळी ११.३० च्या सुमारास उसाची भरलेली एक ट्रॉली शिरोली एमआयडीसीकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या ट्रॉलीने अचानक ब्रेक मारल्याने मागे असलेली एक कारही थांबली. मात्र, यावेळी मागून … Read more

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका): 1971 च्या युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर तर्फे 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरुन एकूण 50 किमीची ही रन असणार आहे, ज्यात कोणालाही कोणत्याही ठिकाणाहून … Read more

पोलीस क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

50 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष गटाला विभागून तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बाजी कोल्हापूर : पोलीस विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास पुणे विभागाचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 50 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय समारंभावेळी बोलताना व्यक्त … Read more

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत देण्यात येणार आहे. या 133 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण … Read more

केक विषबाधेत दोन बालकांचा मृत्यू

कागल( सलीम शेख): कागल तालुक्यातील चिमगांव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नातेवाईकांनी आणलेला केक खाल्ल्याने दोन बालकांचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार, ३ जुलै रोजी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चिमगांव येथील रणजित नेताजी आंगज यांच्या चार वर्षांच्या मुलाला श्रीयांश आणि सात वर्षांच्या मुलीला काव्या यांनी नातेवाईकांनी आणलेला केक खाल्ला … Read more

उत्कृष्ट लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करा

कोल्हापूर (जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगाशी निगडीत विविध योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकाकडून जिल्हा पुरस्कार योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उद्योग घटकाने विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दि. 31 डिसेंबर 2024 पूर्वी जिल्हा उद्योग केंद्रास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील … Read more

एड्स मुक्त जिल्हा म्हणून लवकरच कोल्हापूरची नवी ओळख निर्माण होईल – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीने धैर्याने एड्सचा मुकाबला करून सुदृढ जीवन जगावे – सिने अभिनेते सागर तळाशीकर कोल्हापूर, दि. 03 : जागतिक एड्स दिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास संबोधित करताना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले की, एड्स आजाराविषयी वारंवार करत असलेल्या जनजागृतीमुळे एच.आय.व्हीचा प्रसार रोखण्यात तसेच एड्समुळे होणाऱ्या मृत्यूत घट … Read more

error: Content is protected !!