बातमी
कागलला गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती
कागल (सलीम शेख): दिवाळी आणि गैबी उरुस या सणांच्या निमित्त कागल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले यांच्या प्रतिकृतींचे अद्भुत प्रदर्शन भरले आहे. शहरातील प्रत्येक चौक आणि गल्लीमध्ये लहान-मोठे मुले आपल्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा अद्भुत नमुना मांडत गडकिल्ले उभारत आहेत. या वर्षीच्या प्रदर्शनात गडकिल्ले बांधणीच्या बाबतीत एक नवीनच उंची गाठली आहे. किल्ल्यांची हुबेहू प्रतिकृती, त्यांची आकर्षक … Read more
कागल गहिनीनाथ गैबी उरुसात भक्तीचा महासागर
कागल(सलीम शेख): कागल येथील ग्रामदैवत हजरत श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुस रविवारी भाऊबीजच्या शुभ मुहूर्तावर भव्यदिव्यरीत्या सुरू झाला. यात्रास्थळी भाविकांची मोठी गर्दी उमटली. पहिल्या दिवशी झालेल्या गलेफाच्या कार्यक्रमात हजारो भक्त उपस्थित होते. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी, गुरूवारी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा गलेफ,पाचवा गलेफ पार पडला. या प्रत्येक दिवशी भक्तीभावाने भक्त दर्गेत दाखल होत … Read more
पैलवान संदिप मोठे, भारत मदने यांनी कागल चे कुस्ती मैदान जिंकले
शाहू साखर कारखान्याकडून श्री. गहिनीनाथ गैबी पीर उरूसानिमित्त आयोजन कागलः येथील ग्रामदैवत श्री.गहिनीनाथ गैबी पीर उरूसानिमित्त श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या दोन कुस्त्या झाल्या. यामध्ये सांगलीचा संदिप मोठे याने उपहिंदकेसरी तुषार डुबे याला घुटना डावावर चितपट केले. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये बारामतीचा मल्ल भारत मदने याने शाहू … Read more
गहिनीनाथ ऊरूस कालावधीत 24 तास आरोग्य विभाग यंत्रणा कार्यरत
कागल : कागल नगरपरिषद आरोग्य विभागाचे वतीने गहिनीनाथ उरूसा निमित्ताने 24 तास यंत्रणा सुरू ठेवली आहे. यामध्ये 100 कर्मचारी काम करत आहेत, रस्ते सफाई सकाळी आणि संध्याकाळी या दोन सत्रात महिला सफाई कर्मचारी यांचे वतीने सुरू ठेवली आहेत. तसेच कचरा उठाव 24 तास सुरू ठेवला आहे या करिता 15 कर्मचारी काम करत आहेत 10 घंटागाडी दैनंदिन … Read more
भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा
पिंपळगाव खुर्द (प्रकाश पाटील) : भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने त्यांना मिळालेला मतदानाचा पवित्र हक्क १०० टक्के बजावावा असे आवाहन कागल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे यांनी केले. व्हन्नूर (ता.कागल) येथे स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत कागल तहसील व पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या सायकल रॅली, गीत गायन कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे … Read more
कागल मध्ये किरकोळ कारणावरून डोक्यात धारदार हत्याराने वार
कागल (विक्रांत कोरे): किरकोळ कारणावरून एकाच्या डोकीत तलवारी सारख्या धारदार हत्याराने तीन वार केले. या झालेल्या हल्ल्यात कृष्णात जयसिंग सोनुले वय वर्षे – 50, राहणार- महात्मा फुले वसाहत कागल, हा गंभीर जखमी झाला आहे. बापूसाहेब महाराज चौकात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे. कागल पोलिसांनी चार … Read more
जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 121 उमेदवार निवडणूक लढविणार 80 उमेदवारांची माघार
कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 121 उमेदवार निवडणूक लढविणार असून 80 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांची मतदार संघनिहाय नाव, पक्षाचे नाव व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे. 271- चंदगड विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह 1.कुपेकर-बाभुळकर नंदाताई ऊर्फ नंदिनी, (नॅशनेलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार), तुतारी वाजवणारा माणूस 2.कांबळे … Read more
निरंजन दूध संस्थेच्या विकासात सौ पूजा माने यांचे मोलाचे योगदान: प्रा. सुरेश डोणे
कागल (प्रतिनिधी): निरंजन दूध संस्था सौंदलगा (ता. निपाणी) या संस्थेच्या कार्याचा आदर्श इतर संस्थाने घ्यावा असे प्रतिपादन प्रा.सुरेश डोणे यांनी केले. ते संस्थेच्या दिवाळी बोनस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. विवेक माने होते. प्रा. सुरेश डोणे पुढे म्हणाले की, निरंजन दूध संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूजा योगेश माने … Read more
बाळकृष्ण सणगर यांचे चित्रांचे प्रदर्शन
कागल : कागल येथील हौशी चित्रकार श्री बाळकृष्ण ज्ञानदेव सणगर ( सध्या रा. नेहरु नगर,कोल्हापूर) यांच्या ऑइल कलर मधील चित्रांचे प्रदर्शन सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 ते बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे भरविण्यात येणार आहे. वयाच्या 85 व्या वर्षीही बाळकृष्ण सणगर हे विविध प्रकारची चित्रे रेखाटत आहेत. … Read more