सिद्धनेर्ली येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिद्धनेर्ली ता. कागल येथील निसर्ग व पर्यावरण संघटना आणि गावतील नागरिक याच्या माध्यमातून गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी देशी वृक्षाची रोपे लावण्यात आली. सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते पिंपळ वृक्षाचे पुजन करून वृक्षारोपनाला सुरवात करण्यात आली. गेली अनेक वर्षे सिद्धनेर्ली  गावात वृक्षारोपण व संगोपन हा उपक्रम राबविला जात आहे. … Read more

Advertisements

१० वी, १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व बांधकाम कामगारांसाठी संसार साहित्य वाटप

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिध्दनेर्ली ता. कागल येथे नामदार हसनसो मुश्रीफ फौंडेशन, शाखा-सिध्दनेर्ली यांच्यावतीने १० वी , १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व नोंदीत बांधकाम कामगारांसाठी संसार साहित्य वाटप गोकुळ दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे शुगर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कागल … Read more

मुरगूड शहरात महिलांनी भक्तिभावाने केली वट सावित्री पूजा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात जागोजागी महिलांनी भक्तिभावाने वट सावित्री पूजा केली. हिंदू धर्म शास्त्रानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला ही पूजा केली जाते.सावित्री आणि सत्यवान या पतीपत्नींची पौराणिक कथा या उत्सवाला जोडली गेली आहे.कौटुंबिक संस्काराचे हे आदर्श असे प्रतिक मानले जाते. या दिवशी महिला उपास सुध्दा करतात. वटपौर्णिमा सणाचे शास्त्रीय महत्व सुध्दा सांगण्यात … Read more

विमल इंग्लिश हायस्कूल कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

सूळकुड (सुरेश डोणे): कोल्हापूर येथील विमल इंग्लिश हायस्कूलमध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात आला.या योग दिनाच्या निमित्ताने योगशिक्षिका जयश्री नागवेकर उपस्थित होत्या.त्यांनी विद्यार्थ्याकडून योगाची प्रात्यक्षिक करून घेतली.आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांसाठी योगा, प्राणायाम,ध्यान,धारणा महत्त्वाची आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच “करा योग…. रहा निरोग.” याचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.       संस्थेच्या सचिव लिना मॅडम यांच्या … Read more

योगगुरू जयराम पाटील यांच्या उपस्थितीत शिवराजमध्ये जागतिक योगदिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्य साधारण आहे.योगाने आपले जीवन तंदुरुस्त व आनंददायी बनते. यासाठी प्रत्येकाने नियमित योगासने केली पाहिजेत असे प्रतिपादन ए .एम. चौगले यांनी केले. ते जागतिक योगदिना निमित्त शिवराज विद्यालयाच्या पटांगणावर सामुदायिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते. प्राचार्य पी डी माने यांची प्रमुख उपस्थिती … Read more

पर्यावरण सेवा योजना व राष्ट्रीय हरित सेना यांच्यावतिने मुरगूडच्या शिवराज विद्यालयामध्ये वटवृक्ष पुजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : शाळातून व ग्रंथालयातून जगण्याचे ज्ञान मिळते तर वृक्ष आपणास प्रत्यक्ष जगवत असतात. या वृक्षांप्रती आपण कृतज्ञतापूर्वक वर्तन केले पाहिजे, ते आपले पालनकर्ते आहेत. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले.  ते शिवराज विद्यालय मुरगूडच्या पर्यावरण सेवा योजना व राष्ट्रीय हरित सेना यांच्यावतिने आयोजित महाराष्ट्र वृक्षदिना निमित्त वटवृक्ष पुजन कार्यकम … Read more

डेंग्यू सदृश्य साथीची लक्षणे मुरगूडात पालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून खबरदारी !

मुरगूड ( शशी दरेकर ) : पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणातील बदल व पावसाच्या कमी-जास्त प्रमाणामुळे पावसाळ्यातील साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मुरगूड शहरात डेंग्यू सदृश्य साथीची लक्षणे आढळल्याने पालिका व आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे .          शहराच्या कांही भागात डेंग्यू सदृश्य साथीची लागण झालेले रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीती पसरली आहे पालिका … Read more

मुरगूड मधील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा – नागरिकांची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील गल्ली बोळातून आणि मुख्य रहदारी च्या रस्त्यावर सुध्दा भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. शहरातील विविध नागरी वस्तीत( कॉलनी) येथे सुध्दा भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.     शाळकरी मुले व मुली यांना या कुत्र्यांमुळे त्रास तर होतोच शिवाय भुकेल्या कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यामुळे गंभीर प्रसंगाना तोंड द्यावे लागते. … Read more

राधानगरी येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत

मुरगूड (शशी दरेकर) : राधानगरी येथिल शासकीय निवासी शाळेमध्ये सन२०२४ -२५मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात व पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्य – पुस्तक, टॅब , व इतर शालेयउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किरवेकर मॅडम यानीं नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शाळेबद्दल माहिती दिली . यावेळी … Read more

मुरगुड येथे विशाळगडावरील अतिक्रमण काढावे व अन्य मागणीसाठी निवेदन

हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी मुरगुड ( शशी दरेकर ) : विशाळगड मुक्ती आंदोलन संदर्भात आणि हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगुड येथील शिवतीर्थ येथे निदर्शने करण्यात आले . विशाळगडावरील 1886 च्या बॉम्बे गॅझेट नुसार गडावरील दर्गा … Read more

error: Content is protected !!