बेनिक्रे येथे एकाच रात्रीत तीन बंद घरे फोडली

तिन्ही घरात काहीच न मिळाल्याने चोरटे हात हलवत परतले मुरगूड ( शशी दरेकर ) :  बेनिक्रे ता.कागल येथे एकाच रात्रीत तीन बंद घरांचे कडी, कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केला.यामध्ये दोन घरातील तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून टाकले तर एक घरातील कपड्यांचा ट्रंक फोडून साहित्य विस्कटून फेकले गेले आहे. या तिन्ही घरात चोरट्यांना काहीच हाती लागले नाही … Read more

जागतिक साहित्य दिनाच्या अनुषंगाने मुरगुड मध्ये सायकल तिरंगा फेरीचे आयोजन

मुरगुड(शशी दरेकर) जागतिक सायकल दिनाच्या निमित्य ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेले अतुल्य शौर्य आणि शहिदांचा गौरव करण्यासाठी तिरंगा सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. मुरगुड शहरांमध्ये पर्यावरण प्रेमींच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवतीर्थ येथे जमण्याचे आवाहन सोशल मीडिया मार्फत करण्यात आले होते. यावेळी … Read more

समाजकार्यांत व विद्यार्थ्यांत सेवानिवृत्ती नंतरही इंग्रजी विषय ज्ञानदानाच्या प्रभुत्वासाठी कार्यरत रहा – आमदार जयंत आसगावकर

मडिलगे (जोतीराम पोवार) –  शाळा तसेच विद्यार्थ्यांच्यात इंग्रजी विषया विषयी गोडी निर्माण केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरही यापुढे समाजकार्यात व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानासाठी कार्यतत्पर रहा असे प्रतिपादन पुणे मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी केले. ते वाघापूर ता. भुदरगड येथील वाघापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.पी.पाटील. यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्य मानपत्र वितरण व सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, अध्यक्षस्थानी केदारर्लिंग … Read more

ऍड. विपुल दुशिंग यांच्या सनदेच्या रद्दीकरणाची ‘बसप’ची मागणी

वैष्णवी हगवणे-कस्पटे प्रकरणात नवा ट्विस्ट पुणे : राज्यभरात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे-कस्पटे मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे. बहुजन समाज पक्षाने (बसप) हगवणे कुटुंबीयांचे वकील विपुल दुशिंग यांच्या सनदेच्या तात्काळ रद्दीकरणाची मागणी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे केली आहे. दुशिंग यांच्या असंवेदनशील आणि खालच्या स्तरातील युक्तिवादाने पीडितेचे आणि तिच्या कुटुंबियांचे चारित्र्यहनन होत असून, न्यायालयाची दिशाभूल … Read more

सिद्धनेर्ली आणि व्हनाळी येथे ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १२ जून २०२५ पर्यंत राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत नुकतेच कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली आणि व्हनाळी येथे कृषीविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा), कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक … Read more

कसबा सांगाव येथील चोरीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश

कागल/प्रतिनिधी : कसबा सांगाव तालुका कागल येथील वाकी धरणग्रस्त वसाहतीमध्ये बंद घरातून रोख रक्कम यासह सोन्या चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केला होता. सुमारे १० लाख ७३ हजार ६९५ रुपयांची चोरी झाली होती.या चोरीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश आले आहे. आरोपी राजासाहेब गुलाब नायकवडी, वय वर्ष- 43 ,राहणार -सोलापूर ,तालुका -हुक्केरी, जिल्हा -बेळगाव … Read more

सोयाबीनचे दर घसरणार ? तेलबियावरील आयात शुल्क कपातीमुळे शेतकरी चिंतेत

मोदी सरकार ने शेतकऱ्याच्या पोटात खंजीर खुपसला मुंबई, (२ मे): केंद्र सरकारने तेलबियावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त करत आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून, त्यांच्या पोटावर पाय दिल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आयात शुल्क कपातीचा परिणाम: तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी … Read more

आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना यशासाठी मार्गदर्शन करण्यात आले. महावीर महाविद्यालयाचे प्रा. गोपाळ गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यशाला कोणताही शॉर्टकट नाही. “अभ्यासात सातत्य हेच यशाचे खरे सूत्र असून, विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करून … Read more

लालपरीचा ७७ वा वर्धापन दिन मुरगूड बस स्थानकावर उत्साहात संपन्न

नागरीकाना व प्रवाशानां साखर – पेढे वाटून आनंद व्यक्त मुरगूड ( शशी दरेकर ) : लाल परी म्हणजेच एस टी महामंडळाचा ७७  वा वर्धापन दिन मुरगूड येथील एसटी बस स्थानकावर उत्साहात संपन्न झाला.        एस टी महामंडळाने स्त्रियांना ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे.त्याशिवाय जेष्ठ नागरिक,अमृत प्रवास ,विद्यार्थी विद्यार्थिनी, दिव्यांग नागरिक, अशा अनेक सवलती प्रवाशांना … Read more

घरकुल लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि विशेषतः घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कठोर निर्देश त्यांनी दिले आहेत. शुक्रवार, ३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

error: Content is protected !!