कागल येथे सावत्र मुलाने केला आईवर हल्ला

कागल(विक्रांत कोरे): शिव्या का देतोस असे आईने मुलग्यास विचारले, विचारल्याचा राग मनात धरून मुलाने आईवर हल्ला चढवला आणि मारहाण केली. त्यात आई जखमी झाली. तिच्यावर कागल ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. प्रशांत गणेश शिंदे राहणार कळमवाडी वसाहत कागल असे वेळाने मारहाण करणाऱ्या मुलाचे नाव आहे संगीता गणेश शिंदे(वय ४२) राहणार काळम्मावाडी वसाहत कागल असे जखमी … Read more

Advertisements

विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या सभासदांना 11% डिव्हीडंट जाहीर ऑनलाइन सभेत अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची घोषणा

मुरगूड ( शशी दरेकर ) : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या पारदर्शी कारभारमुळे आर्थिक वर्षात 40 लाख 52 हजार इतका विक्रमी नफा झाला असल्याने बँकेच्या सभासदांना 11 टक्के डिव्हिडंड देणार असल्याची घोषणा बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांनी ऑनलाइन घेण्यात आलेल्या 74 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.कोरोनामुळे ऑनलाइन घेण्यात आलेल्या सभेत सुमारे चारशे सभासदांनी सहभाग घेतला. … Read more

लक्ष्मी नारायण पतसंस्थेची ५५वी ऑनलाइन सर्वसाधारण सभा उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथील सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेली लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ५५ वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत व उत्साहात पार पडली.प्रारंभी संस्थेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व लक्ष्मीनारायण प्रतिमेचे पूजन संस्थेचे माजी सेवक ‘ श्री .बळीराम रामाणे , हरी वंदूरे , आप्पासो पाटील , दिलीप शिंदे, जयसिंग भांदिगरे … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडून किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटीचा दावा दाखल

कोल्हापुरातील दिवाणी न्यायालयात दाखल केला दावा कोल्हापूर दि.२८ : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात मंत्री श्री मुश्रीफ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील व कायदेतज्ञ ॲड. प्रशांत चिटणीस व त्यांचे सहकारी ॲड सतीश कुणकेकर यांनी हा दावा दाखल केला. याबाबत … Read more

काय तक्रार केली किरीट सोमय्यांनी मंत्री मुश्रीफांवर पोलिस स्थानकामध्ये ; पहा बातमी

मुरगुड : भाजप खासदार किरीट सोमय्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगूड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांवर तक्रार दाखल केली आहे. मुश्रीफ यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करुन १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ व परिवारावर सरसेनापती संतांजी … Read more

मुरगूडच्या व्यापारी ना. सह. पतसंस्थेची २२ वी ऑनलाईन सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार

मुरगूड( शशी दरेकर ): मुरगूड तालुका कागल येथील मुख्य बाजारपेठेतील नागरिकांच्या जिव्हाळ्याची संस्था म्हणून ओळख असणाऱ्या व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 वी ऑनलाइन सर्वसाधारण सभा चेअरमन किरण गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी संचालक हाजी धोंडीबा मकानदार व महादेव तांबट यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व नामदेव पाटील व … Read more

श्री सिध्देश्वर दूध संस्थेच्या वतीने दुध उत्पादकांना मोफत अपघाती विमा

सिद्धीनेर्ली (लक्ष्मण पाटील) : श्री सिध्देश्वर दुध संस्थेच्या वतीने दुध उत्पादकांचा मोफत अपघाती वीमा उतरण्याचा व दसरा भेट देऊन प्रतिवर्षाप्रमाणे उच्चांकी बोनस व डिव्हीडंड देण्याचा निर्णय आॕनलाईन झालेल्या संस्थेच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन सौ. सुवर्णा मधुकर आगळे होत्या.संस्थेला दूध पुरवठा करुन शेअर्स रक्कम पूर्ण करणाऱ्या सर्वांना गट तट … Read more

मुरगूड येथे भारत बंदला तुरळक प्रतिसाद

ऐतिहासिक हु.तुकाराम भारमल चौकात शेतकरी कामगार विरोधी केंद्र शासनाचा निषेध मुरगूड ( शशी दरेकर ) : केंद्र सरकारच्या भांडवलदार धार्जिण्या व कृषी विरोधी धोरणांचा निषेध करत मुरगूड ता. कागल येथील विविध परिवर्तनवादी,पुरोगामी पक्ष व संघटनांनी भारत बंदला पाठिंबा व्यक्त केला.अखिल भारतीय शेतकरी संघटनांच्या वतीने अन्यायी कृषी बिल विरोधातील आंदोलन व भारत बंदचे आवाहन करण्यात आले … Read more

भारत बंद ला कागल मध्ये अत्यल्प प्रतिसाद

एस टी स्टॅन्ड येथे केंद्र सरकार चा निषेध कागल(एस सणगर): केंद्र शासनाने केलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज, एस.टी.स्टॕड, कागल येथे निषेध करुन निदर्शने करण्यात आली,या आंदोलनात राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी, महाविकास आघाडी, शेतकरी संघटना व शिवराज्य मंच या संघटनेनी सहभाग घेवून केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी … Read more

शाहू पतसंस्थेची 46 वी ऑनलाईन सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड तालुका कागल येथील सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेली व दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 46 वी ऑनलाईन सर्वसाधारण सभा येथील शिवराज विद्यालय मुरगुड येथे संस्था चेअरमन श्री. दत्तामामा सोनाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत पार पडली, प्रारंभी संचालक वीरेंद्र … Read more

error: Content is protected !!