आय. जी. एम. रुग्णालयाकडील ४२ कर्मचाऱ्यांच्या समावेशनास शासनाची मान्यता – राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर : इचलकरंजी येथील आय. जी. एम. रुग्णालयातील 42 कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाला मान्यता दिली आहे. या सर्व 42 कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडे लवकरच सामावून घेतले जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे. इचलकरंजी नगरपरिषदेचे आय. जी. एम. रुग्णालय हे 2016 साली … Read more

Advertisements

पंतप्रधानही संसदेत (Parliament ) नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या ! : नाना पटोले

नोकरभरती घोटाळ्याची तार कुठपर्यंत आहे हे समजले पाहिजे. मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून प्रश्न विचारत त्यांचा चार्ज दुसऱ्यांकडे द्यावा अशी विचारणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आधी संसदेची (Parliament) माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद वगळता अधिवेशनात कधीच उपस्थित नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्या, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना … Read more

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका(new registration serie) 27 डिसेंबरपासून सुरु

 कोल्हापूर:  खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FX दि. 24 डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FY  दि. 27 डिसेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली. … Read more

सोनाळीतील ११ जणांविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुरगूड (शशी दरेकर) : सोनाळी ता. कागल येथील वरद पाटील खुन प्रकरणात आरोपी असणाऱ्या कुटुंबीयातील विठ्ठल गुंडा वैद्य यांनी आपल्यावर गावातीलच ११ जणांच्या जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न करुन पत्नीसह आपल्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची फिर्याद मुरगूड पोलिसात दिली आहे. यात प्रकरणी मुरगूड पोलिसात ११ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सोनाळी, ता.कागल येथे … Read more

कागलच्या शाहू साखरची (shahu-sakhar) निवडणूक बिनविरोध; शुक्रवारी(ता. २४) होणार अधिकृत घोषणा

कागल(प्रतिनिधी) : देशाच्या साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या कागलच्या श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची (shahu sugar) पंचवार्षिक निवडणूक आज सोमवारी(ता.२०) निवडून द्यावयाच्या पंधरा जागांइतकेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध झाली. कारखाना बहुराज्यीय असल्याने येत्या शुक्रवारी (दि.२४) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. विरोधी आघाडीचे सर्वसाधारण गटातून तीन व संस्था गटातून … Read more

श्रीकृष्ण विकास संस्थेच्या चेअरमनपदी शरद चव्हाण

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारी श्रीकृष्ण विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी शरद बाबुराव चव्हाण यांची तर व्हा. चेअरमन पदी सौ. सरिता कुमार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडी संपन्न झाल्या. दरम्यान सभेपूर्वी संस्थेचे ज्येष्ठ … Read more

शाहू साखर कारखान्यातर्फे ऊस तोडणी मजुरांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण

कागल(विक्रांत कोरे) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर भागातील ऊस तोडणी मजुरांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर झाले. यावेळी 500 हून अधिक मजुरांना लसीकरण केले .या शिबिराचे उद्घाटन शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले ओमिक्रोन व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कारखाना ऊसतोड मजुरांसाठी मोफत … Read more

व्हनाळी हनुमान दूध संस्थेच्या चेअरमनपदी हिंदुराव जाधव

व्हनाळी(सागर लोहार): व्हनाळी तालुका कागल येथील श्री हनुमान सह. दूध व्यावसायिक संस्थेच्या चेअरमन पदी हिंदुराव सुभाना जाधव यांची तर व्हा. चेअरमन पदी बाळासो निचिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडी माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. यावेळी माजी चेअरमन एम.टी.पोवार, संचालक श्रीपती वाडकर, पांडुरंग पाटील ,विश्वास पाटील, पांडुरंग … Read more

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ केडीसीसीवर बिनविरोध

कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. कागल तालुका विकास सेवा संस्था गटातून त्यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक अधिकारी अरुण काकडे यांनी मंत्री  मुश्रीफ यांना बिनविरोध घोषित केले. त्याबद्दल पालकमंत्री व  गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजयदादा मंडलिक, आमदार राजेश पाटील, … Read more

गोरंबेचे माजी सरपंच प्रकाश चौगुले यांचा अपघाती मृत्यू

दुर्गमानवाडजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलीला ठोकरले गोरंबे(प्रतिनिधी): गोरंबे (ता. कागल) येथिल माजी सरपंच प्रकाश बाजीराव चौगुले( वय ५७) यांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला. दुर्गमानवाड (ता. राधानगरी) येथिल विठ्ठलाईदेवीच्या दर्शनासाठी मोटर सायकलवरून गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार … Read more

error: Content is protected !!