मुरगूडमधील ग्रामदैवत “अंबाबाई मंदिर “सुशोभीकरणासाठी भरीव निधी देवु : – आमदार हसन मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता. कागल येथील अंबाबाई मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी आपण कोट्यावधी रुपयाचा निधी आतापर्यंत दिला आहे. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मंदिराचा प्रश्न मार्गी लागल्याने मी समाधानी आहे. मा.प्रविणसिंह पाटील यांच्या सततच्या रेट्या मुळेच मी हा निधी देऊ शकलो. येथुन पुढे मंदिर सुशोभीकरणासाठी आवश्यक असणारे सहकार्य … Read more

Advertisements

कऱ्हाडच्या ” लिगाडे पाटील ” ज्यूनियर कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : कऱ्हाड येथिल लिगाडे पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या नीट सेट परिक्षेत बोर्डात यश संपादन केलेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार नुकताच कऱ्हाड येथिल श्री .समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दौलतवाडी ( ता. कागल ) येथील माजी सरपंच मा . श्री . श्रीकांतराव भोसले हे होते … Read more

जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : जिल्ह्यात दि.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत हागणदारी मुक्त अधिक गाव या विषयावर जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, दि.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधरवडयामध्ये ग्राम पंचायतस्तरावर परिसर स्वच्छता करावी. … Read more

सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी मार्फत सुसज्ज त्रिस्तरीय ऊस बियाणे मळा व ऊस रोपवाटिकेची सुरुवात

कागल(प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या सुसज्ज ऊस बियाणे मळा व ऊस रोपवाटिकेचा शुभारंभ आज करनुर येथे कारखान्याचे अध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे संचालक श्री. नविद हसनसो मुश्रीफ यांच्या शुभहस्ते झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविताना श्री.नविद मुश्रीफ म्हणाले, संताजी घोरपडे कारखान्याच्या ऊस विकास योजनांमध्ये त्रिस्तरीय बियाणे मळा पद्धतीचा अवलंब … Read more

आयटीआय व्हनाळी चा 100% निकाल

सलग बारा वर्षे निकालाची परंपरा कायम व्हनाळी(वार्ताहर) : व्हनाळी ता. कागल येथील कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआयचा शैक्षणिक वर्ष 2020-22 चा अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागलाअसल्याची माहिती आयटीआयचे प्राचार्य आर .डी. लोहार यांनी दिली. या संस्थेची स्थापना ऑगस्ट 2009 मध्ये झाली असून सन 2022 मध्ये सलग बारा वर्षे शंभर टक्के … Read more

शेतक-यांच्या विश्वासहर्तेत ‘ अन्नपुर्णा ‘चे यश : संजयबाबा घाटगे

अन्नपुर्णा पाणी पुरवठा संस्थेची 30 वी सर्वसाधारण सभा संपन्न, 25 लाख निवळ नफा व्हनाळी(सागर लोहार) : सहकार ही सामान्य माणसाची चळवळ आहे. त्याच्या माध्यमातून सर्वसमावेशक पिढ्यानपिढ्याचे कोट कल्याण करता येते. हे अन्नपुर्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेने दाखवून दिले आहे. त्यामुळे सहकार शक्तीचे अन्नपुर्णा हे उत्तम उदाहरणच आहे. सभासदांनी दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळेच यंदाच्यावर्षी संस्थेला 25 लाखा नफा … Read more

मुरगूड नगरपालिकेला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर, दिल्लीत होणार सन्मान

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपरिषदेला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुन्हा एकदा मुरगूड नगरपालिकेचा दिल्लीत सन्मान होणार असून या योजनेचा ब्रँड अॅम्बॅसिडर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे . असे गौरवउद्गारॲड विरेंद्र मंडलिक यांनी काढले. नगरपरिषदेस जाहिर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . अॅड … Read more

कारखान्याचे स्वभांडवल उभारणीसाठी सभासदांनी अर्थिक कुवती नुसार ठेवीच्या रूपाने स्वनिधी द्यावा – चेअरमन खासदार संजय मंडलिक

मुरगूड ( शशी दरेकर ) : इथेनॉल निर्मिती हे भविष्यात आपल्या कारखान्यास वरदान ठरणार आहे., आपल्या देशाला दरवष ५५० कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कारखान्याने इथेनॉल प्रकल्पाची दैनंदिन निर्मिती क्षमता दुप्पट करणे, दैनंदिन उस गाळप क्षमता वाढविणे. तसेच सह वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सभासदांचे हित जपणारा आहे. … Read more

कागलमधील झोपडपट्टी धारकांना मिळाली हक्काची मालकीपत्रे -आमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश

कागलमधील कुरणे वसाहत ठरली राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी कागल, दि. २४: आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमधील कुरणे वसाहतीमधील ५४ झोपडपट्टीधारकांना हक्काची मालकीपत्रे मिळाली. नियमितीकरण झालेली कुरणे वसाहत ही राज्यातील पहिलीच झोपडपट्टी ठरली आहे. या वसाहतीच्या नियमितीकरणासाठी आमदार हसनसाहेब मुश्रीफ व नगरसेवक सतीश घाडगे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना झोपडपट्टीधारकानी व्यक्त केली. नियमितीकरण झालेल्या … Read more

तहसिलदारांना पोटखराब वर्ग अ क्षेत्राची अतिरिक्त आकारणी करण्याचे अधिकार

collector

कोल्हापूर : पोटखराब वर्ग अ मधील क्षेत्र जमीन धारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणी प्रमाणात अतिरिक्त आकारणी करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपध्दती अनुसरून काढावयाचे अंतिम आदेश पारीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना प्रदान केले आहेत. तरी अशा शेतक-यांनी आपल्या तालुक्यातील तहसिलदारांशी संपर्क साधून आपल्या गटामधील अशा शेतक-यांनी पोटखराब क्षेत्र अ लागवडीखाली आणण्याचे प्रस्ताव गावकामगार तलाठी … Read more

error: Content is protected !!