मुरगूडचा गैबी पीर ऊरूस १५ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ ला विविध कार्यक्रमानी होणार साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता . कागल ) येथे सालाबादप्रमाणे हजरत गैबी पीर ऊरुस१५ जानेवारी ते १९ जानेवारी अखेर विविध कार्यक्रमानी साजरा होत आहे. बुधवार दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संदल मिरवणूक व रात्री ९ वाजता झी टॉकीज फेम, बीग बॉस फेम ह. भ. प. शिवलीलाताई पाटील (बार्शिकर) यांचा किर्तनाचा कार्यक्रम, … Read more

श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलचे विद्यार्थी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याला व गोकुळ प्रकल्पला भेट

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज गोकुळ प्रकल्पला भेट देऊन तेथील दुध व दुग्धजन्य पदार्थ कसे तयार करतात व दुधाचे पकिग व कार्यकसे चालते याविषयी माहिती घेऊन नंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस यंत्रणेच्या कार्याविषयी सखोल माहिती घेतली. या कार्यशाळेत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी कसे कार्य करतात, … Read more

राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या मथळ्याखाली समाज माध्यमांवर फिरत आहे फसवणूक करणारा संदेश

कोल्हापूर दि.13 : राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या मथळ्याखाली  समाज माध्यमांवर फिरत असणारा संदेश फसवणूक करणारा असून यावर कुठल्याही उमेदवारांनी विश्वास ठेवू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर प्रशासनाने कळविले आहे.  उमेदवारांनी अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवून दिलेल्या लिंकवर माहिती अथवा पैसे जमा करू नयेत. सद्या अशा कोणत्याही पद भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more

गोकुळ शिरगाव सराफ असोसिएशनचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

गोकुळ शिरगाव ( सलीम शेख) :  गोकुळ शिरगाव परिसर सराफ असोसिएशनचा पहिला वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असे म्हणत निसर्ग जपाचा संदेश देण्यात आला. सराफांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन करवीर सराफ सुवर्णसन कोल्हापूरचे अध्यक्ष संभाजी नाळे यांनी सराफांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन … Read more

मुरगुड येथे गाईने दिला दोन तोंडे तीन डोळयांच्या वासराला जन्म

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे निसर्गाचा अदभूत चमत्कार पाहावयास मिळाला.येथील प्रशांत रंगराव मोरबाळे यांचा मुरगुड येथील भावेश्वरी चौक येथे गोठा आहे. त्या ठिकाणी त्यांनी अलिकडेच एक गाय विकत घेतली होती. आज त्या गाईने चक्क दोन तोंडे व तीन डोळे असलेल्या वासराला जन्म दिला या वासराला तीन डोळे आणि दोन … Read more

सदाशिवराव मंडलिक इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये शपथविधी कार्यक्रम  उत्साहात पार

मुरगूड  ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग,मध्ये शपथविधीचा (lamp lighting & Oath taking) कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक कोल्हापूर डॉ सुप्रिया देशमुख या प्रमुख पाहुण्या होत्या अध्यक्षस्थानी संस्था कार्याध्यक्ष व युवानेते ॲड. विरेंद्र मंडलिक होते.     कार्यक्रमाची सुरवात ही दिप प्रज्वलाने झाली जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ सुप्रिया … Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच अपात्र

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : हातकणंगले पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांचा जातीचा दाखला संशयास्पद असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली आहे. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या चौकशीनंतर भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाही, असे निष्कर्ष … Read more

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांची  जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांनी केली पाहणी

कोल्हापूर : मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयास तसेच परिसराला भेट देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांनी पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. कार्यालयीन स्वच्छता व बाह्य स्वच्छता तात्काळ करुन घ्यावी, असेही यावेळी निर्देश दिले. त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीबाहेरील पार्कींग व्यवस्थेचे नियोजन, कार्यालयातील इतरत्र अस्ताव्यस्त असलेले सध्या वापरात नसलेले साहित्य नियमानुसार … Read more

साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा – भैरवनाथ डवरी

मुरगूड (शशी दरेकर) – साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो. आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्यांचे सुक्ष्म निरीक्षण लेखका मार्फत केले जाते आणि अंगभूत प्रतिभा शक्तिच्या जोरावर लेखकांकरवी आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तव मांडले जाते. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून नवोदित लेखकानी जीवनातील निवडक घटनांची मांडणी  साहित्यातून केली पाहिजे … Read more

मुरगूड मध्ये स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्य गुरुवार ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत श्री. स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा पादुकापूजन, श्रींच्या आरतीने उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी अक्कलकोट येथिल स्वामी समर्थ महाराज व पादुकांचे स्वागत संस्थेचे चेअरमन, … Read more

error: Content is protected !!