कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

कोल्हापूर, दि. २५ (जिमाका) :  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very heavy Rainfall at isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा … Read more

Advertisements

राधानगरी धरण भरले, जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.21 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, … Read more

पैसे तिप्पट प्रकरणातील आरोपींना अटक

कागल / प्रतिनिधी : रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून रुपये एक लाखास  गंडा घातला होता. सदर प्रकरणातील आरोपीस कागल पोलिसांनी तारीख 22 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली आहे. अशोक बापू पाटील वय वर्षे 52 राहणार बेलवळे ,तालुका कागल असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे. अशोक हा बेपत्ता होता. तो एका राजकीय पक्षाचा तालुका अध्यक्ष … Read more

ग्रामपंचायत कर्मचारी कडून स्मशानभूमीची स्वच्छता

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रेरणादायी कार्य सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता. कागल येथील गावसाठी पाणी पुरवठा करणारी मोटारीचे काम करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकारी येऊ पर्यंत काय करावे म्हणत लगतच असणाऱ्या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता स्मशान भूमी स्वच्छ केली. अधिक माहिती अशी, गेले 3 तर चार दिवस सिद्धनेर्ली  परिसरात संतधार पावसाने दूधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत … Read more

माता-भगिनींच्या प्रेमावर जीव ओवाळून टाकला तरी कमीच – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता

लाडकी बहीण योजनेची मंजुरीपत्रे व बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप सिद्धनेर्ली : गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत माता-भगिनींनी अनंत आशीर्वाद दिले आणि प्रेम केले. माता-भगिनींच्या या  आशीर्वाद आणि प्रेमावर जीव ओवाळून टाकावा तितका कमीच आहे, अशी कृतज्ञता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. या पुण्याईच्या कवचकुंडलामुळेच आजवरच्या वाटचालीत यशस्वी झालो आणि सुरक्षित राहिलो, … Read more

मुरगूड येथे जिजा गवाणकर हिचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपून केला साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) :  मुरगूड येथिल बाजारपेठेतील माजी नगरसेवक मा. श्री. किरण विठ्ठल गवाणकर यांची नात कु . जिजा अनिकेत गवाणकर हिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात वातावरणात सपन्न झाला . या वाढदिवसानिमित्य शिवशंकर प्राथमिक व भावेश्वरी माध्यमिक आश्रमशाळा चिमगांव येथे गरीब व होतकरू विद्यार्थी -विद्यार्थिनिना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, … Read more

सुळकूड येथे स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण

सुळकूड( प्रा.सुरेश डोणे) : सुळकूड (ता.कागल) येथील स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या स्थापनेला १५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गावातील स्मशानभूमी व मराठी शाळा परिसरामध्ये स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले. यामध्ये नारळ, करंजी, गुलमोहर, वड,जांभूळ,अशोक, पिंपरी आदी वृक्ष लावण्यात आले.     यावेळी स्वामी विवेकानंद विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमोल शिवई,सागर बाळांण्णा,भगवान चवई, प्रकाश मुद्दाण्णा, नयन खंडेराये,विजय … Read more

सुळकूड येथील दुधगंगा नदीवरील जुना बंधारा पाण्याखाली

सुळकूड (प्रा.सुरेश डोणे) : दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे दुधगंगा पाणलोट क्षेत्रात पुरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे.पावसामुळे सुळकूड (ता.कागल) येथील जुना बंधारा पाण्याखाली गेला असून दुधगंगा नदी परिसरामध्ये पुरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थिती मध्ये नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचेआव्हाहन पोलीस पाटील ,सुळकूड ग्रामपंचायत, तलाठी ऑफिस व आरोग्य विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

तृतीयपंथी “पांडुरंग गुरव ” यांच्या दातृत्वातून ज्ञानमंदिरास लाखाची मदत

जोगव्यातुन जमा केलेल्या पैशातून आदमापूर प्राथमिक शाळेस  एक लाखाची मदत “तृतीय पंथीय “पांडुरंग गुरव ”यांची अनमोल मदत सभ्य समजणाऱ्या माणसांच्या डोळ्यात लख्ख अंजन घालणारी … “ मुरगूड ( शशी दरेकर ) : आसगोळी ता. चंदगड येथील तृतीयपंथी पांडुरंग गुरव  यांचे आदमापूर हे मूळगाव नसताना आणि तेथील प्राथमिक शाळेशी काडीचाही संबंध  नसतानाही जोगवा मागत जमा केलेले … Read more

विशाळगड प्रकरणातील शिवभक्तांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत शिवभक्त मुरगुडकर यांची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : विशाळगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरचे अतिक्रमण पाहता गडाचे गडपण हरवत चालल्याची भावना मनामध्ये आल्यानेच भावनिक होत शिवभक्तांकडून घडलेले कृत्याची त्यांना कठोर शिक्षा देऊ नये त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत या मागणीसाठी मुरगुड मध्ये शिवभक्त समाजसेवक आणि मुरगूड शहरवासी यांनी मुरगूड पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी करे यांना … Read more

error: Content is protected !!