किरीट सोमय्यांच्या दंडेलशाहीला राज्य सरकारने चाप लावावा: अतुल लोंढे

मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे उद्योग सोमय्यांनी बंद करावेत मुंबई, दि. २६ एप्रिल : भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून … Read more

Advertisements

बालकांच्या हक्कांची पायमल्ली न होता त्यांना घटनेने दिलेले हक्क द्यावेत- सरपंच पूजा मोरे

पिंपळगाव खुर्द(आण्णाप्पा मगदूम): व्हन्नूर ता.कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर या प्रशालेत ग्रामपंचायत व्हन्नूर यांच्यामार्फत बालसभेचे आयोजन केले होते. या बालसभेत बालकांचे हक्क आणि कर्तव्य, बालविवाह, बालकामगार, १५ व्या वित्त आयोगातून बालकांना मिळणाऱ्या सुविधा, सामाजिक सुरक्षा या सारख्या अनेक विषयांवर चर्चा घडून आली. यावेळी व्हन्नूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा मोरे यांनी बालसभेची संकल्पना मांडली. … Read more

संजयबाबा मुळेच शेतकऱ्यांचे कोटकल्याण : अशोक पाटील

साके येथे संजयबाबा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व्हनाळी (सागर लोहार): साके व्हनाळी, केनवडे, गोरंबे या कोरडवाहू पांढऱ्या पट्ट्यात अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोंगर कपारीवर शेतीला पाणी उपलब्ध करून देऊन या भागाचे नंदनवन केले शिवाय परिसरात हरित क्रांती निर्माण करून शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्याचे कोटकल्याण करण्याचे काम माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले असे प्रतिपादन … Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात टिपला पट्टेरी वाघ कोल्हापूर : वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षण करिता ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून 100 ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यात आले होते. हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी दाजीपूर जंगलामध्ये लावण्यात आला असून … Read more

निवृत्त शिक्षकांनी शिक्षणाच्या कार्यातून निवृत्त होऊ नये – शिक्षक आमदार जयंत आसगांवकर

मडिलगे ( जोतीराम पोवार) : निवृत्ती धारक शिक्षकांनी निवृत्तीनंतर कुटुंबा बरोबरच समाजकार्यासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरूच ठेवावे असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी केले. ते वाघापूर ता. भुदरगड येथील वाघापूर हायस्कूल चे मुख्याध्यापक अशोक मारूती बरकाळे यांच्या सेवानिवृत्त सपत्निक सत्कार गौरव समारंभ व मानपत्र वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी स्थानिक देवस्थान … Read more

अबब …….. तब्बल १११ अद्ययावत वाहने पोलीस दलाला सुपूर्द

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या रु. 4 कोटी 65 लाख रुपयांची 111 अद्ययावत वाहने आज पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. यामध्ये 47 चारचाकी व 64 दुचाकींचा समावेश आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत अनेक उपक्रम, योजना राबविण्यात येत असून यापुढेही पोलीस दलासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल.पोलीस दलानेही गुणात्मकदृष्ट्या काम … Read more

पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” मोहीम

कोल्हापूर, दि. 22 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू केली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतंर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ही मोहीम देशभर राबविण्यात येत आहे. यासाठी “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” नावाची मोहीम दि. 24 एप्रिल ते 1 मे 2022 या … Read more

तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करावेत – सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर, दि. 22 : जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टलची’ माहिती होण्यासाठी जास्तीत जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी National Portal For Transgender Persons या वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे. राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य व … Read more

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

कोल्हापूर, दि. 22 : जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे दि. 10 ते 20 मे दरम्यान दोन सत्रात आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये जास्तीत-जास्त मुला-मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे. शिबीरामध्ये कुस्ती, योगासन, बुध्दीबळ, टेबल टेनिस, जलतरण, फुटबॉल, हॉकी, … Read more

करनूर कुस्ती मैदानात बानगेच्या पैलवान शशिकांत बोंगार्डेची बाजी

कागल(विक्रांत कोरे): करनूर तालुका कागल येथे भव्य कुस्ती मैदान पार पडले. प्रथम क्रमांकासाठी बानगे चा पैलवान शशिकांत बोंगार्डे व इंचलकरंजी चा पैलवान श्रीमंत भोसले यांच्यात लढत झाली. यामध्ये बानगेचा पैलवान शशिकांत बोंगार्डे याने अकराव्या मिनीटाला लवदल काढून घिस्सा डावावर इंचलकरंजी चा पैलवान श्रीमंत भोसले याला अस्मान दाखविले. येथील मरीआई बिरदेव यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित … Read more

error: Content is protected !!