मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड येथील बस स्थानक परिसरामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते त्याचबरोबर सांडपाण्याद्वारे येणारी दुर्गंधी देखील पसरली होती यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवासांना याचा खूपच त्रास होत होता . हा होणारा त्रास ओळखून बस स्थानकाच्या परवानगीने येथील कुबेर डेव्हलपर्स यांनी येथे परिसरातील रिकाम्या जागी बगीच्या फुलवण्याचा संकल्प केला आहे.
त्यानुसार 225 झाडे लावून मध्यभागी बैठकीसाठी लॉन ची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे . त्यानुसार नुकतीच पावसाळ्यास सुरुवात झाल्यामुळे झाडे लावण्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला .या वृक्षारोपणामुळे बस स्थानक परिसर हिरवागार आणि कचरा आणि दुर्गंधीमुक्त होणार आहे . तसेच प्रवासांना बसण्यासाठी उत्तम सोय होणार आहे याबद्दल नागरिकात समाधान व्यक्त होत आहे . यावेळी बबन बारदेस्कर,अविनाश चांदेकर, राजू डांगे , सर्जेराव भाट,ओंकार पोतदार ,सुमित चांदेकर ,जगदीश गुरव ,राजू खोत, शरद चांदेकर, अवधूत चव्हाण , संजय राठोड आदी उपस्थित होते.