देश उभारणीसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा -प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

“अर्थशास्त्र विभागाचा अभ्यासपूर्ण शैक्षणिक उपक्रम; भित्तीपत्रकातून विद्यार्थ्यांनी समजून घेतला विकासाचा आराखडा”

मुरगूड ( शशी दरेकर ):

अर्थसंकल्प हा देश उभारणीचा भक्कम पाया असून राष्ट्रीय प्रगतीचा दिशादर्शक दस्तऐवज आहे. विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प समजून घेतल्यास त्यांची आर्थिक जाणीव प्रगल्भ होते आणि सजग नागरिक घडण्यास मदत होते, असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे कार्यतत्पर प्राचार्य डॉ शिवाजी होडगे यांनी केले ते अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ या विषयावर तयार करण्यात आलेल्या अभ्यासपूर्ण भित्तीपत्रकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

  भित्तिपत्रकाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. रघुनाथ ढमकले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मा. स्वागत परुळेकर, मा. रणजीत नलवडे, मा. महादेव कानकेकर, मा. दादा लवटे, मा. संभाजी मांगले तसेच प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देशाच्या आर्थिक धोरणांचा आणि विकासाच्या आराखड्याचा सखोल परिचय करून देण्याचा उद्देश साध्य करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय हेरवाडे यांनी केले. स्वागत प्रा स्वप्निल मेंडके व प्रा. अवधूत पाटील यांनी केले. आभार रामचंद्र पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा डॉ सोनाली कुंभार यांनी केले.

अर्थशास्त्र विषयाचे अभ्यासक कु. निलेश पाटोळे, कु. आदर्श जाधव, कु. श्रावणी हळदकर व कु. उषा जाधव यांनी अर्थसंकल्पातील महसूली जमा, खर्च, वित्तीय तूट, रोजगार, कृषी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तरतुदींचे सोप्या भाषेत प्रभावी सादरीकरण केले. तक्ते, आकृत्या आणि माहितीपूर्ण टिपांच्या साहाय्याने अर्थसंकल्प आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला.
यावेळी  प्रा. दीपक साळुंखे, प्रा. दादासाहेब सरदेसाई, प्रा. डॉ. माणिक पाटील,प्रा. डॉ. पांडुरंग फराकटे, प्रा. डॉ हनुमंत सोहनी, प्रा. सुशांत पाटील, प्रा. राहुल बोटे, प्रा. नितेश रायकर, लेफ्ट. विनोद प्रधान, प्रा. धनाजी खतकर, रोहीत परीट उपस्थित होते.
महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!