मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाचा महाशिवरात्रोत्सव उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. नारळां पासून बनवलेले सोळा फूट उंचीचे शिवलिंग व नंदी यांचा देखावा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. चिमगांव चे अनिल अंगज भाई व मुरगूड चे राजू भाई या कलावंतांनी यासाठी दोन दिवस अविश्रांत परिश्रम घेतले.देखावा पहाण्या करिता पंचक्रोशीतील भाविक येत होते.
ब्रह्माकुमारी लताबहेन यांनी ओघवती भाषेत शिवबाबांच्या 88 व्या प्रकट दिनाचे औचित्य आणि अध्यात्मिक महत्त्व सांगितले.त्यानंतर त्यांच्या प्रतिमेसमोर उपस्थित भाविकांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले.जन्मदिनाच्या निमित्ताने केक ही कापण्यात आला.
विश्वविद्यालयाचा ध्वज त्यांच्या हस्ते फडकविण्यात आला.
देखाव्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे वि. रा. भोसले व इंदलकर यांचे हस्ते करण्यात आले. या अप्रतिम उत्सव समारंभासाठी योगदान दिलेल्या बहेंनजी व भाईंची नावे याप्रमाणे लक्ष्मी बहेंनजी,भांबरे भाई,श्रीमंधर भाई, भाई,भिकाजी भाई,मगदूम भाई,निवास भाई,संभाजी भाई,(सर्व मुरगूड),कोरे भाई ,मुदाळ तिट्टा,राम भाई यमगे, शशिकांत भाई दौलतवाडी,भाकरे भाई निढोरी.